लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात द ओव्हल मैदानावर पाचवा कसोटी सामना सुरु आहे. हा इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
त्यामुळे त्याला इंग्लिश मिडियाने चौथ्या दिवसाखेर झालेल्या पत्रकार परिषदेत 33 बिअरच्या बॉटल्स भेट म्हणून दिल्या आहेत. कूकने इंग्लंडकडून कसोटीत 33 शतके केली असल्याने त्याला 33 बिअरच्या बॉटल्स भेट दिल्या आहेत.
याबद्दल एक पत्रकार म्हणाला, “सर्व मिडियाच्या वतीने आम्ही तू खेळाडू आणि कर्णधार म्हणून इंग्लंडसाठी जे केलसं आणि विशेषत: आमच्याशी जसा वागलास त्याचे कौतुक करतो.”
“खेळताना तूला अनेक चढ-उतार आले, पण तू आमच्याशी चांगला वागलास. त्यामुळे आम्हाला तूझ्या या वागण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणून आम्ही तूझ्यासाठी छोटी भेट आणली आहे.”
“जेव्हा आपण एकदा जेवायला गेलो होतो तेव्हा तू मला म्हणाला होता की तू वाईन ड्रिंकर नाही तर बिअर मॅन आहेस. त्यामुळे आम्ही तूझ्यासाठी 33 बिअर बॉटल्स आणल्या आहेत आणि त्या प्रत्येक बॉटलवर मिडियातील प्रत्येक सदस्याने दिलेला एक छोटा संदेश आहे.”
A lovely touch! 👏 pic.twitter.com/9UaO1T6nrp
— England Cricket (@englandcricket) September 11, 2018
याबरोबरच कूकने आभार मानत मागील चार दिवस हे अविश्वसनीय असल्याचेही सांगितले आहे. कूकने या सामन्यात चौथ्या दिवशी 14 चौकारांच्या सहाय्याने 286 चेंडूत 147 धावा करताना आपले 33 वे कसोटी शतक आणि शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले होते.
कूकने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 161 कसोटी सामन्यात 33 शतके आणि 57 अर्धशतकांसह 12,472 धावा केल्या आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अवघ्या नऊ धावांनी कोहलीचा तो विक्रम हुकला
–टॉप ५: शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम