ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. या संपूर्ण सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांचा दबदबा होता. परंतु, सामन्याच्या पाचव्या दिवशी (८ ऑगस्ट) पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार केले आहे. यासह त्याने एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
जसप्रीत बुमराहला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्याची निराशाजनक कामगिरी पाहून त्याला संघाबाहेर करा, अशी देखील मागणी केली गेली होती. परंतु, कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला इंग्लंड संघाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत संधी दिली आहे. त्याने पहिल्याच कसोटी सामन्यात ९ गडी बाद केले. त्याने अप्रतिम कामगिरी करत पहिल्या डावात ४ गडी बाद केले तर दुसऱ्या डावात त्याला ५ गडी बाद करण्यात यश आले होते.
बुमराहने नवीन विक्रम केला आपल्या नावावर
जसप्रीत बुमराहचा हा २१ वा कसोटी सामना होता. या कसोटी सामन्यात त्याने ९ गडी बाद केले. यासह त्याच्या नावे ९२ कसोटी विकेट्सची नोंद झाली आहे. २१ सामन्यात असा कारनामा करत त्याने अनेक भारतीय दिग्गजांना मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराह हा सुरुवातीच्या २१ कसोटी सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी इरफान पठाणने २१ कसोटी सामन्यात ८१ गडी बाद केले होते. तर माजी भारतीय दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी २१ कसोटी सामन्यात ७९ गडी बाद केले होते. तर मोहम्मद शमीने २१ कसोटी सामन्यात ७१ गडी बाद केले होते. तसेच फिरकी गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी २१ कसोटी सामन्यात सर्वाधिक १०८ गडी बाद केले होते. (india vs england first test ends with a draw but jasprit bumrah creates history )
Most wickets by Indian pacers after 21 Tests
92 – Jasprit Bumrah
81 – Irfan Pathan
79 – Kapil Dev
71 – Mohd Shami
70 – S SreesanthOnly six other Indian bowlers (all spinners) have more wickets than Bumrah after 21 Tests
(Maximum: Anil Kumble 108)#IndvEng#ENGvsIND— Mohandas Menon (@mohanstatsman) August 7, 2021
जहीर खानलाही सोडले मागे
जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यात ११० धावा खर्च करत ९ गडी बाद केले. अशी कामगिरी करत त्याने दिग्गज भारतीय गोलंदाज जहीर खानला मागे सोडले आहे. तो इंग्लंडमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा जहीर खानने केला होता. त्याने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत १३६ धावा खर्च करत ९ गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या-
‘पाऊस आला नसता तर आम्ही भारताच्या नऊच्या नऊ विकेट घेतल्या असत्या,’ कर्णधार रूटची प्रतिक्रिया
धोनीमुळे माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले; ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे वक्तव्य
उर्वरित कसोटी मालिकेत कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर