लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 332 धावा केल्या आहेत. तसेच भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलनेही खास विक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात जेव्हा मिड-आॅनला क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा झेल घेतला तेव्हा त्याने या 5 सामन्यांच्या मालिकेत 13 झेल घेण्याची कामगिरी केली.
याआधी यष्टीरक्षक व्यतिरिक्त एकाही क्षेत्ररक्षकाला इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत 13 झेल घेण्याची कामगिरी करता आलेली नाही.
याआधी इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक आयकिन, वॅली हॅमंड, इयान बॉथम आणि अॅलन बॉर्डर या क्षेत्ररक्षकांच्या नावावर होता. त्यांनी इंग्लंडमध्ये खेळताना एका कसोटी मालिकेत प्रत्येकी 12 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.
राहुलने ब्रॉडचा झेल पकडल्यानंतर एक आणि तीन असे हाताच्या बोटांनी दर्शवत त्याची ही कामगिरीचे सेलिब्रेशन केले.
याबरोबरच राहुलने ही कामगिरी करताना अजून एक खास विक्रम केला आहे. त्याने राहुल द्रविडच्या एका कसोटी मालिकेत 13 झेल घेण्याच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. द्रविडने 2004-2005मध्ये भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 13 झेल घेतले होते.
एका कसोटी मालिकेच सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांमध्ये(यष्टीरक्षक व्यतिरिक्त) आॅस्ट्रेलियाचे जॅक ग्रेगोर अव्वल क्रमांकावर आहेत. त्यांनी एका कसोटी मालिकेत 15 झेल घेण्याचा विक्रम केला आहे. हा पराक्रम त्यांनी 1920-21 मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेत केला होता.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर 14 झेलसह आॅस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल आहेत. तर द्रविडबरोबर 13 झेलांसह तिसऱ्या क्रमांकावर बॉब सिम्सन आणि ब्रायन लारा देखील आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाचवी कसोटी: बर्थडे बॉय बटलरने सावरला इंग्लंडचा डाव; तर टीम इंडियाची अडखळत सुरुवात
–Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!
–Video: मैदानावर ठेका धरणाऱ्या शिखर धवनने भज्जीलाही केले भांगडा करण्यास प्रोत्साहित