---Advertisement---

ठरलं तर! एक गोष्ट जुळून आली की टीम इंडिया थेट फायनलमध्ये

On: बुधवार, जून 26, 2024 1:03 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या सेमी फायनल सामन्यांना उद्या (27जून) सुरुवात होईल. यादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. सेमीफायनल-2 ज्यामध्ये भारत-इंग्लंड सामना खेळवला जाणार आहे. त्यासाठी राखीव दिवस नाही. जर या सामन्यादरम्यान पाऊस आल्यास सामना रद्द झाल्यास भारत थेट अंतिम फेरी गाठेल. कारण या सामन्यांसाठी केवळ 7 तास 20 मिनिटे इतका वेळच दिला जाणार आहे. तरीही सामना पूर्ण झाला नाही, तर भारत अंतिम फेरीत जाईल.

टी20 विश्वचषक सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला हारवून भारतीय संघ यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या सेमी फायनल साठी पात्र ठरला. तर इंग्लंड संघ अमेरिकेला नमवून सेमी फायनलसाठी आधीच पात्र ठरला होता. तर आता सेमीफायनल-2 मध्ये दोन वेळेसचा विजेता इंग्लंड आणि भारत आमने-सामने असणार आहेत. हा सामना 27 जून रोजी गयाना येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्यास रात्री 8 वाजता सुरुवात होईल. पण आयसीसीने या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवसाची मान्यता दिली नाही. त्यामुळे या सामन्यास 7 तास 20 मिनिटे इतका वेळच पुरवला जाणार आहे. जर या दरम्यान पावसाने खोळंबा केला तर सामना रद्द झाल्यास टीम इंडियाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल कारण गुणतालिकेत भारतीय संघ इंग्लंड संघापेक्षा पुढे आहे.

मागील 2022 च्या टी20 विश्वचषकात सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव केला होता. या सामन्यात इंग्लंडने 10 विकेट्सनी बाजी मारली होती. पण आता या परिस्थितीत टीम इंडिया मागील वचपा काढेल असे दिसत आहे. कारण भारतीय संघ इंग्लंडपेक्षा जास्त लयीत आहे. किंवा पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारतासाठी सोन्याहून पिवळं होईल. कारण भारत थेट फायनध्ये एंट्री मारेल. तर दुसरीकडे सेमीफायनल-1 मधये दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान भिडणार आहेत.

महत्तवाच्या बातम्या-

“क्रिकेट मैदानापासून बॉलीवूडपर्यंत…” युवराज सिंगची डेव्हिड वाॅर्नरसाठी खास पोस्ट
भारत की इंग्लंड..गयानामध्ये कोणाचं दबदबा, टीम इंडियासाठी 2 खुशखबर, फायनलचं तिकीट पक्कं?
‘भारतीयांनी चेंडूसोबत छेडछाड केलीय’, अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---