---Advertisement---

IND vs ENG: भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या आकडेवारीवर एक नजर, सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम धोक्यात

On: गुरूवार, जानेवारी 25, 2024 8:57 AM
England-vs-India
---Advertisement---

INDIA vs ENGLAND TEST: भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून भारतात (IND vs ENG) पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील ही मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 131 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये इंग्लंडने 50 तर भारताने 31 कसोटी जिंकल्या आहेत. याशिवाय 50 कसोटी बरोबरीत राहिल्या आहेत. उभय संघांमधील पहिली कसोटी 25 ते 28 जून 1932 मध्ये लॉर्ड्सवर खेळली गेली होती आणि ती भारताची पहिली कसोटी होती. त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 158 धावांनी पराभव केला होता. (india vs england test records sachin tendulkar ind vs eng 2024)

उभय संघांमधील शेवटची कसोटी 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे खेळली गेली आणि इंग्लंडने हा कसोटी सामना 7 विकेट्स राखून जिंकला. उभय संघांमध्ये खेळलेली शेवटची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती.

आता दोन्ही संघांमधील कसोटी सामन्यांच्या महत्त्वाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया:

संघ विक्रम-
एका डावात सर्वोच्च धावसंख्या

भारत – 759/7 (चेन्नई, 2016)

इंग्लंड – 710/7 (बर्मिंगहॅम, 2011)

डावातील सर्वात कमी धावसंख्या

भारत – 42 (लॉर्ड्स, 1974)

इंग्लंड – 81 (अहमदाबाद, 2021

सर्वात मोठा विजय

भारत – डाव आणि 75 धावा (चेन्नई, 2016), 317 धावा (चेन्नई, 2021) आणि 10 विकेट (मोहाली, 2001)

इंग्लंड – डाव आणि 285 धावा (लॉर्ड्स, 1974), 319 धावा (नॉटिंगहॅम, 2011) आणि 10 विकेट्स (लॉर्ड्स 1946)

सर्वात छोटा विजय

भारत – 28 धावा (कोलकाता 1972) आणि 4 विकेट (ओव्हल 1971 आणि चेन्नई 1973)

इंग्लंड – 31 धावा (बर्मिंगहॅम, 2018) आणि 6 विकेट (लीड्स 1967 आणि दिल्ली 1972)

फलंदाजी विक्रम-

सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर (2535 धावा, 32 सामने)

जो रूट (2526 धावा, 25 सामने)

डावातील सर्वोच्च धावसंख्या

ग्रॅहम गूच – 333 (लॉर्ड्स, 1990)

करुण नायर – 303* (चेन्नई, 2016)

सर्वाधिक शतके

राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर – 7

जो रूट – 9

सर्वाधिक अर्धशतके

सुनील गावस्कर – 16

जो रूट – 10

धर्वाधिक वेळा ० धावांवर बाद झालेले फलंदाज

बिशनसिंग बेदी – 11

जॉनी बेअरस्टो – 7

मालिकेत सर्वाधिक धावा

ग्रॅहम गूच – 752 धावा, 3 सामने (1990)

विराट कोहली – 655 धावा, 5 सामने (2016)

गोलंदाजी विक्रम-

सर्वाधिक विकेट्स

भागवत चंद्रशेखर – 95 विकेट्स, 23 सामने

जेम्स अँडरसन – 139 विकेट्स, 35 सामने

डावातील सर्वोत्तम गोलंदाजी

फ्रेड ट्रुमन – 8/31 (मँचेस्टर, 1952)

विनू मांकड – 8/55 (चेन्नई, 1952)

कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी

इयान बोथम – 13/106 (मुंबई, 1980)

विनू मंकड – 12/108 (चेन्नई, 1952)

एका डावात सर्वाधिक 5 विकेट्स

भागवत चंद्रशेखर – 8

इयान बोथम – 6

मालिकेत सर्वाधिक विकेट्स

भागवत चंद्रशेखर – 35 विकेट, 5 सामने (1972)

फ्रेड ट्रुमन – 29 विकेट्स, 4 सामने (1952)

हेही वाचा

क्रिकेटर ऑफ द इयर बनल्यानंतर गिल इमोशनल, विराटचं नाव घेत म्हणाला…
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन रामभक्तीत तल्लीन! हिंदीत पोस्ट लिहून सर्वांना केले चकित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---