भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामन्यात शनिवारी (30 सप्टेंबर) पावसाने व्यत्यय आणला. विश्वचषक 2023 पूर्वी शुक्रवारी (29 सप्टेंबर) सराव सामन्यांना सुरुवात झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. पावसामुळे सामना रद्द झाला, अशा बातम्या आल्या होत्या. पण काही वेळानंतर हा सामना उशिरा सुरू होणार, असे सांगितले जात आहे.
ताज्या माहितीनुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे अद्याप रद्द केला गेला नाहीये. सामना सुरू करण्यासाठी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत पाट पाहिली जाईल. परिस्थिती खेळण्याइतपत ठीक असेल, तर हा सामना खेळवण्याचा निर्णय पंच घेऊ शकतात. (India Vs England Warm Up match is still not called off)
We are at the ground, and the match is still not called off. https://t.co/PElQJp1XdT
— Rajneesh Gupta (@rgcricket) September 30, 2023
सराव सामन्यासाठी उभय संघ
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
इंग्लंड-
डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, सॅम करन, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, रीस टोपले, मार्क वूड.
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: ऋतुजा भोसले-रोहन बोपन्ना जोडीने जिंकले गोल्ड! एशियन गेम्समध्ये भारताचे 9 वे सुवर्ण
विश्वचषकाविषयी अश्विनचे धक्कादायक विधान; जे काही म्हणाला, ते वाचून तुम्हालाही बसेल शॉक