टीम इंडियासाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची (एनसीए) फिटनेस टेस्ट पूर्ण केली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 21 फेब्रुवारीपासून (शुक्रवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे या मालिकेत इशांत भारतीय संघाकडून खेळण्यासाठी तयार आहे.

सूत्रांनी आयएएनएसशी बोलताना माहिती दिली की, इशांत फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाला आहे. त्याचबरोबर आता तो न्यूझीलंड विरुद्ध होणारी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

इशांतला अरुण जेटली स्टेडियममध्ये विदर्भ संघाविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या सामन्यात खेळताना घोट्याला दुखापत झाली होती. ही दुखापत तिसऱ्या ग्रेडची होती. त्यामुळे त्याला सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

भारत-न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21-25 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. तर, दुसरा सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान खेळण्यात येईल.

You might also like