आजपासून(24 जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला टी20 मालिकेने सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना आज ऑकलँड येथे इडन पार्क मैदानावर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 12.20 ला या सामन्याला सुरुवात होणार आहे.
या टी20 मालिकेत भारत आणि न्यूझीलंड संघातील अनेक खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
या टी20 मालिकेत होऊ शकतात हे विक्रम –
– विराट कोहली आणि केन विलियम्सनमध्ये आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्यासाठी शर्यत असेल. सध्या हा विश्वविक्रम फाफ डू प्लेसिसच्या(1273) नावावर आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्यासाठी आणि फाफ डू प्लेसिसला मागे टाकण्यासाठी विलियम्सनला 191 धावांची तर विराटला 242 धावांची गरज आहे. विलियम्सनच्या सध्या कर्णधार म्हणून 1083 धावा आहेत. तर विराटच्या 1032 धावा आहेत.
-विराटला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा खेळाडू होण्यासाठी 1 अर्धशतकाची किंवा 1 शतकाची गरज आहे. सध्या तो या यादीत फाफ डू प्लेसिससह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. या दोघांनीही 8 वेळा कर्णधार म्हणून टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
-विराटने जर या मालिकेत 8 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो ओएन मॉर्गननंतरचा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 षटकार पूर्ण करणारा दुसरा कर्णधार ठरेल. मॉर्गनने 62 षटकार कर्णधार म्हणून मारले आहेत. तर विराटच्या नावावर 42 षटकार आहेत.
-मिशेल सँटेनरला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 1 विकेटची आवश्यकता आहे.
-सँटेनर बरोबरच इश सोधीलाही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 3 विकेट्सची गरज आहे. याआधी न्यूझीलंडच्या टीम साउथी आणि नॅथन मॅक्यूलम या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
-गप्टिलने या मालिकेत जर 4 झेल घेतले तर तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 झेल घेणारा एकूण तिसरा क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) ठरेल. याआधी डेव्हिड मिलर आणि शोएब मलिकने असा कारनामा केला आहे.
काय सांगता! आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी होतोय भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना
वाचा👉https://t.co/YheJEZIpU9👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
न्यूझीलंड दौऱ्यापाठोपाठ आता 'या' सामन्यांनाही मुकणार शिखर धवन?
वाचा👉https://t.co/CJQF8Dog7l👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020