भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा आंतरराष्ट्रीय टी20 सामना लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. असे असले, तरीही भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, ही खेळपट्टी टी20 क्रिकेटसाठी योग्य नव्हती. मात्र, न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकल ब्रेसवेल हा पंड्याच्या वक्तव्याशी सहमत नाही. त्याने लखनऊच्या खेळपट्टीविषयी मोठे भाष्य केले आहे.
‘आम्ही तक्रार करू शकत नाही’
लखनऊच्या खेळपट्टीविषी मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) याने म्हटले की, “ही कदाचित अशी खेळपट्टी नाहीये, ज्यावर तुम्हाला टी20 क्रिकेट खेळावे वाटेल. मात्र, कधीकधी काही शिकणे आणि तुमची कौशल्ये वाढवण्याची एक रोमांचक संधी असते. आम्ही तक्रार करू शकत नाही. या वेगवेगळ्या खेळपट्टीवर खेळण्याची पद्धत शोधणे रोमांचक आहे.”
‘आम्ही धडा घेतला आहे’
मायकल ब्रेसवेल पुढे बोलताना म्हणाला की, “नियमितरीत्या अशा खेळपट्टीवर खेळू वाटणार नाही. अशा सामन्यातून मी धडा घेतला आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येकवेळी अशा खेळपट्टीवर खेळता, जी प्रत्येकवेळी सपाट असते, तेव्हा तुम्हाला तुमच्या कौशल्याची योग्य परीक्षा मिळत नाही. मला वाटते की, जगभरात वेगवेगळ्या प्रकारची खेळपट्टी एक सकारात्मक गोष्ट आहे. साधारणत: घरगुती मैदानातील खेळपट्टीतून कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तत्पर असतात. तसेच, फक्त स्वप्नामध्येच फिरकीपटूंसाठी अशाप्रकारच्या मदतीची अपेक्षा ठेवू शकता.”
अनेक दिग्गजांनी उपस्थित केले होते प्रश्न
खरं तर, लखनऊच्या खेळपट्टीवर खूपच कमी धावसंख्येचा सामना पार पडला. संपूर्ण सामन्यात एकही षटकार पाहायला मिळाला नाही. पाहुण्या संघाने फक्त 99 धावा केल्या होत्या. हे आव्हान गाठण्यासाठी भारतीय संघाला शेवटच्या षटकापर्यंत सामना ओढावा लागला होता. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक म्हणाला होता की, ही खेळपट्टी टी20साठी योग्य नाहीये. या तक्रारीनंतर लखनऊच्या पीच क्यूरेटरला बडतर्फ केल्याचे वृत्त आहे. (india vs new zealand t20 cricketer michael bracewell gave a big statement on lucknow ekana stadium pitch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘युवा खेळाडू टी20 लीग आणि पैशाच्या मागे…’, म्हणत वॉर्नरने बोलून दाखवली कसोटी क्रिकेट संपण्याची भीती
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’