---Advertisement---

कानपूरचे स्टेडियम का आहे श्रेयस अय्यरसाठी खास? पाहा दोन मुंबईकरांची मन जिंकणारी मुलाखत

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 5:15 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड संघात सध्या कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघासाठी श्रेयस अय्यरने त्याचे कसोटी पदार्पण केले. पदार्पण सामन्यात त्याने दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. तत्पूर्वी सूर्यकुमार यादवला देखील या सामन्यात केएल राहुलच्या जागी कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी शक्यता होती, पण त्याला भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये निवडले गेले नाही. असे असले तरी, सूर्यकुमार त्याचा खास मित्र श्रेयसला सामन्यादरम्यान प्रोत्साहन देताना दिसला.

श्रेयस अय्यरने त्याच्या पदार्पण सामन्यात एकूण १७१ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये १०५ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सूर्यकुमराने बीसीसीआय टीव्हीसाठी श्रेयस अय्यरची मुलाखत घेतली. यावेळी अय्यरने सांगितले की रणजी ट्रॉफीमध्ये सुरुवातीच्या दिवसात सूर्यकुमारने त्याचे समर्थन केले होते.

बीसीसीआयने या मुलाखतीचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला असून त्याची थोटी झलक ट्वीटरवर शेअर केली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “त्याने श्रेयसला मिठी मारली, त्याने टाळ्या वाजवल्या, तो सर्वात आनंदी होता, जेव्हा त्याच्या सहकाऱ्याने पदार्पणात शतक केले. सूर्यकुमारसोबतची अय्यरची मुलाखत मन जिंकणारी आहे.”

मुलाखतील श्रेयसने सूर्यकुमारसोबरचे त्याचे संबंध, तसेच कानपूर स्टेडियमविषयी चर्चा केली. श्रेयस म्हणाला की, “हे स्टेडियम माझ्यासाठी खूप भाग्यशाली आहे आणि माझा पहिला रणजी सीजन सूर्यकुमारच्या नेतृत्वात होता. पहिल्या चार डावांनंतर माझी साथ देण्यासाठी मी त्याचे आभार मानू इच्छितो. मी विचार केला होता की, मी संघातून बाहेर होईल, पण त्याने माझी साथ दिली.”

मुलाखतीदरम्यान श्रेयसने कानपूर स्टेडियमवर खेळलेल्या एका जून्या सामन्याचाही उल्लेख केला. त्या सामन्यात मुंबई संघाने २० किंवा ३० धावांवर ५ विकेट्स गमावले होते. अशा परिस्थितीत सामन्यात श्रेयसने खालच्या फळीतील फलंदाजासोबत १५० धावांची भागीदारी साकारली होती. त्याच्या या खेळीमुळे मुंबई संघाचा डाव सावरला होता. तसेच त्याने आयपीएलमध्ये खेळताना देखील याच स्टेडियमवर ९३ धावांची खेळी केली होती. याच पार्श्वभूमीवर हे माझ्यासाठी सर्वात भाग्यशाली मैदान असल्याचे अय्यरने सांगितेल आहे.

कसोटी पदार्पणाविषयी बोलताना श्रेयस म्हणाला की, “कसोटी क्रिकेट खेळणे माझ्यासाठी नेहमीच एक स्वप्न होते. पण माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या पद्धतीने झाल्या. मी टी२०, एकदिवसीय आणि आता कसोटी खेळलो. पण ठीक आहे. मला प्रत्यक्षात आनंदी वाटत आहे आणि पदार्पणात शतक केले आहे. यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. हा जगातील सर्वात चांगला अनुभव आहे.”

महत्त्वाच्या बातम्या – 

“झहीरला पाहून कर्णधार होण्याची प्रेरणा मिळाली”; कमिन्सने केला खुलासा

पाच विकेट्स हॉल घेत फिरकीपटू अक्षरने केले ‘हे’ मोठे विक्रम, ठरला पहिला आणि एकमेव भारतीय 

अनुभवी अश्विनपेक्षाही एक पाऊल पुढे निघाला अक्षर! केवळ ४ कसोटीत ‘इतक्या’ विकेट्स घेत ठरला वरचढ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---