भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली आहे. यानंतर उभय संघात वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे शानदार 36 धावांची महत्त्वाची खेळी साकारली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला 300 धावांचा आकडा पार करण्यात मोलाची मदत झाली होती. मात्र, हॅमिल्टन येथील दुसऱ्या वनडेत सॅमसनला संधी दिली गेली नाही. त्याच्या जागी दीपक हुड्डा याला संघात सामील केले गेले. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय कुणाच्याच गळ्याखाली उतरला नाही. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने ट्वीट करत दोन कारणं सांगितली आहेत.
काय म्हणाला वसीम जाफर?
वसीम जाफर (Wasim Jaffer) याने ट्वीट केले की, “संजू सॅमसन (Sanju Samson) याने शानदार खेळी करूनही त्याला संघाबाहेर करण्यात आले. कारण, आपल्याकडे आवश्यक अष्टपैलू आणि पार्ट टाईम गोलंदाज नव्हते. मला हे समजत नाहीये की, अष्टपैलू आणि पार्ट टाईम गोलंदाजांची कमतरता का आहे?” त्याने पुढे असेही सांगितले की, भारतीय संघाकडे अष्टपैलू खेळाडूंची कमतरता का आहे? तसेच, पार्ट टाईम गोलंदाजांच्या कमतरतेमुळे फलंदाजांना त्याचा फटकाही बसत आहे.
Sanju was dropped despite playing well cos we don't have enough all rounders and part time options. My two cents on why there's a dearth of all rounders and part timers. #NZvIND #SanjuSamson pic.twitter.com/78nKQStEkK
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 27, 2022
‘अष्टपैलू खेळाडूंचा योग्यरीत्या वापर केला जात नाहीये’
जाफरने सांगितले की, अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे. कारण, आपण खेळाडूंना योग्यरीत्या वापर करू शकत नाहीत. आपल्याकडे जास्तीत जास्त खेळाडू नाहीयेत. आपण त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवण्यात घाई करतात. मात्र, काही सामन्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन खराब होताच, ते ज्या वेगाने संघात येतात, त्याच वेगाने संघाबाहेर केले जातात. विजय शंकर, शिवम दुबे आणि कृणाल पंड्या ही काही उदाहरणे आहेत. आपण त्यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून विकसित होण्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे. त्यांना जास्त संधी दिली गेली पाहिजे.”
‘फलंदाज नेट्सवर गोलंदाजी करत नाहीत’
पुढे बोलताना त्याने भारतीय संघाकडे पार्ट टाईम गोलंदाज का नाहीत, याबद्दल सांगितले. जाफरने लिहिले की, “बॉलिंग मशीन, थ्रो डाऊन स्पेशलिस्ट यांच्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजांनी नेट सेशनमध्ये गोलंदाजी करणे बंद केले आहे.”
सॅमसन याने ऑकलंड येथे खेळण्यात आलेल्या वनडे सामन्यात 36 धावांची खेळी साकारली होती. यानंतर त्याला हॅमिल्टन येथील सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्याच्या जागी संघात सामील झालेल्या दीपक हुड्डा याला पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे एकही चेंडू खेळताही आला नाही आणि टाकताही आला नाही. भारताने हॅमिल्टनच्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना 12.5 षटकात 1 विकेट गमावत 89 धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे सामना रद्द करावा लागला. (india vs new zealand wasim jaffer blames team india management know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल
तब्बल 17 वर्षांनी रंगणार इंग्लंड-पाकिस्तान कसोटीचा थरार; स्टोक्स सेना पाकिस्तानमध्ये दाखल