भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या संघासोबत यूएईमध्ये आशिया चषक खेळण्यासाठी गेला आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताला २८ ऑगस्ट रोजी अशिया चषका स्पर्धेतील अभियानाची सुरुवात करायची आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा आहे. या सामन्यापूर्वी कार्तिकने स्वतःची हेयर स्टाईल बदलली, ज्यामुळे चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
कार्तिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून नवीन हेयर स्टाईलची (Dinesh Karthik New hairstyle) रिल शेअर केली आहे. नवीन हेयर स्टाईलमध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) खूपच कुल दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे, तर कमेंट्स देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. अनेकांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, कार्तिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी तयार झाला आहे.
दिनेश कार्तिक मधला मोठा काळ भारतीय संघातून बाहेर होता. त्याने यादरम्यान समालोचकांची भूमिका देखील पार पाडली. कार्तिकला समालोचकाच्या भूमिकेत देखील चाहत्यांकडून तितकेच प्रेम मिळाले, जे त्याला क्रिकेटपटूच्या रूपात मिळाले होते. अनेकांना असे वाटत होते की, कार्तिकची कारकीर्द संपली. परंतु, आयपीएल २०२२ नंतर त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करून दाखवले.
https://www.instagram.com/reel/ChrmoekILHi/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला खरेदी केले आणि तो देखील या विश्वासास पात्र ठरला. कार्तिकने एकट्याच्या जोरावर आरसीबीला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. या प्रदर्शनामुळे भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर देखील त्याने प्रभाव पाडला आणि ब्ल्यू जर्सीत पुनरागमन केले. आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकातही कार्तिक भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो, असे अनेकांना वाटते.
असे असले तरी, पाकिस्तानविरुद्ध रविवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याविषयी खात्री देता येणार नाही. दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि कार्तिक यांच्यातील कोणा एकालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयीचा अंतिम निर्णय कर्णधार रोहित शर्मा आणि वीवीएस लक्ष्मण यांच्यावर अवलंबून असेल. राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्यामुळे वीवीएस आशिया चषकादरम्यान भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शत्रू नव्हे प्रतिस्पर्धी! विराटच्या पुनरागमनासाठी आफ्रिदी करतोय प्रार्थना, व्हिडिओ जिंकेल मन
रोहित, लक्ष्मणसमोर मोठा प्रश्न! पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हुड्डा आणि कार्तिक पैकी कोण होणार इन?
IND-PAK सामन्याची क्रेझ! तब्बल १३२ देशांमध्ये एशिया कपचे लाईव्ह स्ट्रिमींग, भारतात ‘या’ चॅनेलवर पाहाल