वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स मध्ये भारत आणि पाकिस्तान संघामध्ये अंतिम लढत होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी आज (13 जुलै) खेळवली जाणार आहे. भारत चॅम्पियन्सने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि पाकिस्तान चॅम्पियन्सने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवले. या टी20 लीगचा अंतिम सामना 2007 टी20 विश्वचषकाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो कारण दोन्ही संघांमध्ये अनेक खेळाडू आहेत जे 2007 टी20 विश्वचषक फायनलचा देखील भाग होते.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 मधील भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील अंतिम सामना आज, शनिवारी, 13 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सामना सुरू होईल.
2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. जोहान्सबर्ग येथे झालेल्या त्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने 5 धावांनी विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले. या सामन्यात इरफान पठाण ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. अशा परिस्थितीत, यावेळी देखील इरफान पठाणसह अनेक खेळाडू भारत चॅम्पियन्सचा भाग आहेत, ज्यांनी 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळला होता. आता 2024 मध्ये होणाऱ्या लीगच्या अंतिम फेरीत कोणता संघ कोणावर मात करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्पर्धेतील साखळी फेरीत 6 जुलै रोजी भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने भारताला दारुण पराभव दिला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान चॅम्पियन्सने 20 षटकात 243/4 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंडिया चॅम्पियन्सला केवळ 175/9 धावा करता आल्या. अशा प्रकारे भारतीय चॅम्पियन्सला 68 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत विजेतेपदाच्या लढतीत कोणता संघ कोणावर मात करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिकने अनन्या पांडेसोबत धरला ठेका, व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ
धोनी-गंभीरपासून ईशान किशनपर्यंत, या क्रिकेटपटूंनी अनंत-राधिकाच्या लग्नात लावली हजेरी
जेव्हा जेम्स अँडरसननं बॉक्सिंगमध्ये हात आजमावला! ॲशेस मालिकेपूर्वी झाला होता घोळ