चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात झालेली आहे. परंतु, रविवारी महासामना होणार आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान हे संघ समोरासमोर असणार आहेत. दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने बांगलादेश संघाला 6 षटकांनी हरविले आहे तर, पाकिस्तान संघाला न्युझीलंड विरुद्ध हार पत्करावी लागली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ समोरासमोर येण्याची ही सहावी वेळ आहे. या दोन संघाचा शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना केव्हा झाला ते जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना 2017 मध्ये झाला होता. दोन्ही देशांनी गट टप्प्यातील आणि नंतर उपांत्य फेरीतील आव्हान पार करून अंतिम फेरी गाठली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम खेळताना 338 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना फखर जमानने 114 धावांची खेळी खेळल्याने मोठा धक्का बसला. जमान बाद झाल्यानंतर मोहम्मद हाफीजला मोठे शॉट्स खेळण्याचे वेड लागले. हाफीजने 37 चेंडूत 57 धावा केल्या. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि केदार जाधव यांनी खूप उच्च इकॉनॉमी रेटने धावा लुटल्या.
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गतविजेत्या भारतीय संघासमोर अंतिम सामन्यात 339 धावांचे मोठे लक्ष्य होते. मोहम्मद आमिरच्या वेगवान आणि स्विंग चेंडूंनी भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला उडवून दिले. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे त्रिकूट 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. युवराज सिंग काही काळ क्रीजवर राहिला आणि त्याने 22 धावा केल्या. त्याच्याशिवाय एमएस धोनी आणि केदार जाधव फक्त 9 धावा करून बाद झाले.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने फलंदाजीत परिपक्वता दाखवली. त्याच्या 76 धावांमुळे भारत 150 धावांचा टप्पा ओलांडू शकला, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. हार्दिकने 43 चेंडूत 76 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकार मारले. परंतु भारतीय संघाला एकूण 158 धावांवर हार पत्करावी लागली. अशाप्रकारे पाकिस्तानने पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
महत्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान दुबईत समोरासमोर .,केव्हा कुठे पाहता येणार लाईव्ह सामना जाणून घ्या एका क्लिकवर
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मध्ये होणाऱ्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हेन मध्ये कोणाला जागा मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाक संघर्ष: कोणत्या क्षणांनी जिंकली मने?






