भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेेतील धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द झालेला आहे. सामना सुरु व्हायच्या आधीपासूनच ढग दाटून आले होते व सलग पाऊस पडला. कालही पाऊस पडला असल्याने मैदान ओले होते.
संध्याकाळी 5.15 वाजता शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सामनाधिकाऱ्यांनी सामना पावसामुळे रद्द झाल्याची घोषणा केली.
आजपर्यंत दोन्ही संघांनी वनडेत 84 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यात भारताने 35 तर दक्षिण आफ्रिकेने 46 सामने जिंकलेले आहेत आणि 3 सामने अनिर्णित राहिलेत.
पुढील 2 सामन्यासाठी यातून निवडले जाणार संघ-
भारत – विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (विकेटकिपर) शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत(विकेटकिपर), नवदीप सैनी, शुभमन गिल, कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (कर्णधार&विकेटकिपर) तेम्बा बावुमा, फाफ डू प्लेसिस, जेजे स्मुट्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अॅन्डिले फेहलुकवायो, केशव महाराज, लुंगी ए्नगीडी, जानेमन मालन, काईल व्हेर्रेने, अॅनरिच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, डेर ड्यूसेन, ब्युरन हेंड्रिक्स
ट्रेंडिंग बातम्या-
आता हात धुतलेल्या प्रेक्षकांनाच मिळणार टीम इंडियाच्या सामन्याला संधी





