---Advertisement---

टीम इंडियाबाबत धक्कादायक BREAKING! एकाने स्वत: काढून घेतलं नाव, तर दुसरा कसोटी मालिकेतून बाहेर; लगेच वाचा

Team-India
---Advertisement---

Team India Tour of South Africa: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका संपली आहे. आता भारताला वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, या दोन्ही मालिकांपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच, मोहम्मद शमी हादेखील कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

बीसीसीआय (BCCI) बोर्डाने ट्वीट करत संपूर्ण माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले की, दीपक चाहर (Deepak Chahar) याने बीसीसीआयला सांगितले आहे की, तो कुटुंबाच्या वैद्यकीय इमर्जन्सीच्या कारणामुळे आगामी वनडे मालिकेसाठी उपलब्ध राहणार नाही. आता चाहरच्या जागी आकाश दीप (Akash Deep) याला भारतीय संघात (Team India) सामील करण्यात आले आहे.

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत फक्त 7 सामन्यात सर्वाधिक 24 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमी हादेखील कसोटी खेळणार नाहीये. कारण, त्याला कसोटी मालिकेत खेळण्यासाठी फिटनेस सिद्ध करावा लागणार होता, पण त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खेळण्याची मंजुरी दिली नाहीये. अशात विश्वचषकातील हा स्टार गोलंदाज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.

वनडे आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक
येत्या 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील दुसरा वनडे सामना 19 डिसेंबर रोजी केबेरहा येथे आणि तिसरा वनडे सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळला जाईल. विशेष म्हणजे, पहिल्या वनडेनंतर श्रेयस अय्यर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी उपलब्ध नसेल.

दुसरीकडे, कसोटी मालिकेचे वेळापत्रक पाहायचे झाले, तर पहिला सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे पार पडेल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारीदरम्यान केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे पार पडेल. (india vs south africa deepak chahar withdrawn from the odi series and mohammed shami ruled out of the test series india tour of south africa 2023)

हेही वाचा-
धक्कादायक! रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते Out of Control, जाळून टाकली मुंबईची टोपी अन् जर्सी- Video
‘खड्ड्यात गेली मुंबई इंडियन्स…’, रोहितला कर्णधारपदावरून हटवताच संतापले चाहते, सोशल मीडियावर MIची खरडपट्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---