---Advertisement---

काय सांगता! भारत कधीही मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला नाही टी२० मालिका, पाहा आकडेवारी

On: बुधवार, जून 8, 2022 10:57 AM
India-South Africa
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर पोहचला आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या मालिकेत अनेक युवा खेळाडू खेळताना दिसू शकतात. कारण रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या टी२० मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघांची आमने-सामने आकडेवारी काय सांगते, याकडे एक नजर टाकू.

अशी आहे दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ (India vs South Africa) आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५ वेळा आमने-सामने आला आहे. यातील ९ सामने भारताने जिंकले आहेत, तर ६ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाने बाजी मारली आहे. या दोन्ही संघात एकही सामना रद्द झालेला नाही किंवा बरोबरीत सुटला नाही. यावरून एकूणच भारताचे पारडे जड दिसते.

तसेच भारतात टी२०मध्ये ४ वेळा या दोन्ही संघांचा आमना-सामना (Head to Head Record) झाला आहे. यामध्ये मात्र दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. त्यांनी भारतात ३ सामने जिंकले आहेत आणि केवळ १ सामना पराभूत झाला आहे.

या दोन्ही संघांत झालेल्या द्विपक्षीय टी२० मालिकांबद्दल बोलायचे झाल्यास आत्तापर्यंत ६ मालिका (T20I Series) खेळवण्यात आल्या आहेत. यातील तीन मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर दोन मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकल्या आहेत. तसेच एक मालिका बरोबरीत सुटली आहे.

भारताने २००६, २०११ आणि २०१८ साली दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायदेशात पराभूत केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने २०१२ आणि २०१५ मध्ये भारताला पराभूत केले आहे. त्याचबरोबर २०१९ साली झालेली मालिका बरोबरीत सुटली होती. विशेष गोष्ट अशी की भारताने यापूर्वी भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आत्तापर्यंत टी२० मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा ती संधी असणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही संघांत पहिल्यांदाच ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे.

भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा
वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली असल्याने भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांचाही समावेश आहे. या दोघांनाही आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. याशिवाय आवेश खान, ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर, रवी बिश्नोई, हर्षल पटेल या खेळाडूंचाही भारतीय संघात समावेश आहे.

त्याचबरोबर आयपीएल २०२२ मध्ये दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या दिनेश कार्तिकला देखील या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो ३ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळताना दिसू शकतो.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिका वेळापत्रक – जून २०२२ 
९ जून – पहिला टी२० सामना – दिल्ली
१२ जून – दुसरा टी२० सामना – कटक
१४ जून – तिसरा टी२० सामना – विशाखापट्टणम
१७ जून – चौथा टी२० सामना – राजकोट
१९ जून – पाचवा टी२० सामना – बंगळुरू

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

द्रविडसह पंत, श्रेयस, केएल अन्य भारतीय संघापेक्षा ३ दिवस उशीरा जाणार इंग्लंडला; ‘हे’ आहे कारण

पुरुष नाही महिला क्रिकेटपटूंनी रचला होता इतिहास, वनडे सामन्यात ठोकलेल्या ४९१ धावा

जेव्हा सेहवागने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा, २ चेंडूत २१ धावा चोपण्याचा केलता करिश्मा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---