दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाने सोमवारी (६ जून) तयारी सुरू केली. उभय संघातील ही मालिका ९ जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. रविवारी (५ जून) केएल राहुलच्या नेतृत्वातील संपूर्ण संघ दिल्लीमध्ये जमला आणि एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली.
आगामी मालिकेसाठी भारतीय संघ रविवारी एकत्र जमला असला, तरी दक्षिण आफ्रिकी संघ मात्र २ जून रोजीच भारतात दाखल झाला आहे. सध्या दोन्ही संघ सरावाला लागले आहेत, कारण मालिका दोघांसाठीही महत्वाची असणार आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकी दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने कसोटी मालिकेत १-२, तर एकदिवसीय मालिकेत ३-० ने पराभव स्वीकारला होता. आता भारतीय संघ या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल.
— BCCI (@BCCI) June 6, 2022
First practice session ✅
Snapshots from #TeamIndia's training at the Arun Jaitley Stadium, Delhi. 👍 👍 #INDvSA | @Paytm pic.twitter.com/6v0Ik5nydJ
— BCCI (@BCCI) June 6, 2022
प्रशिक्षक राहुल द्रविड तब्बल अडीच महिन्यांनंतर संघासोबत सहभागी झाले आहेत. भारताने त्यांचा शेवटचा सामना १६ मार्च रोजी खेळला होता. त्यानंतर आयपीएल २०२२ हंगाम सुरू झाला आणि द्रविडला काही काळ विश्रांती मिळाली. आता केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाला द्रविड काही खास सल्ले देताना दिसला. बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
Back in Blue – Prep mode 🔛#TeamIndia begin training in Delhi ahead of the 1st T20I against South Africa.@Paytm #INDvSA pic.twitter.com/kOr8jsGJwL
— BCCI (@BCCI) June 6, 2022
दरम्यान, या आगामी मालिकेसाठी भारताचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती दिली केली आहे. याच कारणास्तव कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलवर असेल. उमरान मिलक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांना या मालिकेसाठी पहिल्यांदाच भारतीय संघात सहभागी केले गेले आहे. तसेच अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनीही या मालिकेसाठी संघात जोरदार पुनरागमन केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तुरुंगवासात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंची बिघडली तब्येत, रुग्णालयात करण्यात आले भरती
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?