---Advertisement---

कधी द्रविडला नाचताना पाहिलेले का? दक्षिण आफ्रिकेत तेही घडले! पाहा व्हिडिओ

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 5:11 PM
dravid-dance
---Advertisement---

भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिला बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) कसोटी सामना जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत केले आणि कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघातील हा पहिला कसोटी सामना सेंचुरियनमध्ये खेळला गेला. या मैदानावर भारताने पहिल्यांदाच विजय मिळवला. अशात आता भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड (rahul dravid) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात हे दोघे विजयांच्या आनंदात डान्स करताना दिसत आहेत.

विजयानंतर भारतीय संघ जेव्हा हॉटेलमध्ये माघारी परतला, तेव्हा त्याठिकाणच्या स्टाफने संघाचे जोरदार स्वागत केले. भारतीय संघातील खेळाडूंनी हॉटेलच्या स्टाफसोबत डान्सही केला. कर्णधार विराट कोहली स्टाफसोबत मनमोकळेपणाने नाचताना दिसला, तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील थिरकताना दिसला. या दोघांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कोहली स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, राहुल द्रविड याची थोडीशी झलक पाहायला मिळत आहे.

https://twitter.com/2004sria/status/1476630486864711680?t=F2hEWfpdhYAtp01rFHFClA&s=19

 

चाहत्यांना द्रविडचा हा अंदाज भावला आहे. विजयानंतर द्रविड ज्याप्रकारे आनंद साजरा करत आहेत, त्यासाठी चाहत्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. चाहत्यांच्या मते द्रविडला विजयानंतर डान्स करताना पाहिल्यामुळे ते संघातील इतर खेळाडूंपैकीच एक असल्यासारखे वाटत आहेत.

दरम्यान, भारतीय संघ पहिल्या सामन्यात विजय मिळवून जेव्हा हॉटेलमध्ये परतला, तेव्हा हॉटेलचा स्टाफ त्यांच्या स्वागतासाठी तयार होता. द्रविड आणि विराटचा व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि मोहम्मद सिराजचा (mohammad siraj) डान्स करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. रविंचंद्रन अश्विनने हा व्हिडिओ शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सामन्यांनंतर काढल्या जाणाऱ्या फोटोमूळे खूप बोर झालो होतो. त्यामुळे पुजाराने पहिल्यांदाच मोहम्मद सिराजसह डान्स करून याला संस्मरणीय बनवण्याचा निर्णय घेतला. काय विजय होता.’

महत्वाच्या बातम्या –

भान हरपून नाचायचंय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष

नवीन वर्षातील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय ‘या’ पठ्ठ्याने

विरेंद्र सेहवागच्या बहीणीचा आम आदमी पार्टीत प्रवेश , वाचा पक्षप्रवेशाचे कारण

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---