भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याची बहीण अंजू सेहवाग (Anju Sehwag) यांनी आम आदमी पार्टीमध्ये (AAP) प्रवेश केला आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे अनेक नेते उपस्थित होते. पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम दिल्लीमध्ये पार पडला असून यावेळी आपचे राष्ट्रीय महासचिव पंकज गुप्ता आणि आमदार सोमनाथ भारतीय देखील उपस्थित होते.
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केलेली विकासाची कामे पाहून अंजू प्रभावित झाल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणूका तोंडावर आल्या असताना अंजू सेहवागने आप पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकत नक्कीच वाढेल, असे सांगितले जात आहे.
आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर अंजू सहवाग म्हणाल्या की, आप एक असा पक्ष आहे, ज्यांनी सर्व प्रोटोकॉल तोडले आहेत. अंजू त्यांच्या नवीन पक्षासाठी मन लावून काम करणार असल्याचेही स्पष्ट केले. पुढे बोलताना अंजू असेही म्हणाल्या की, पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती पूर्ण निष्टेने पार पाडेल.
अंजू शर्मा यापूर्वी दिल्लीच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देत होत्या. त्या दिल्लीच्या लक्ष्मण पब्लिक स्कूलमध्ये हिंदी विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यांना दोन आपत्य आहेत. अंजूचे पती एक कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांचे नाव रविंदर सिंग आहे. अंजू आणि रविंदर यांचा विवाह झाल्यानंतर २००० साली अंजू दिल्लीजवळच्या नजफगडमधून मनदगीरी याठिकाणी स्थायिक झाल्या.
अजूं यांनी पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे, अशातला काही भाग नाही. यापूर्वी त्या कॉग्रेस पक्षात होत्या. त्यांनी २०१२ मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर महिलांसाठी आरक्षित असलेल्या दक्षिणपूरी एक्सटेंशन वॉर्डातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्या विरोधात भाजपाच्या प्रात्याशी आरती देवी होत्या. या निवडणुकीत अंजू ५५८ मतांनी जिंकल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
Year Ending 2021 | यावर्षीचे टॉप-१० टी२० फलंदाज, यादीत पाकिस्तानींचा बोलबाला; तर एकही नाही भारतीय
ब्रेट लीची तेजतर्रार गोलंदाजी, मुलाचाही उडवलाय थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
Bye Bye 2021 | ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला
व्हिडिओ पाहा –