श्रीलंकादाैऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा पहिला टी20 सामना 27 जुलै रोजी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता पल्लेकेले येथे खेळवला जाईल. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरेल. त्यासोबत श्रीलंका देखील या साठी प्रयत्नशील असेल. टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादव या सांभाळणार आहे. त्याचबरोबर गौतम गंभीर नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदार्पण करणार आहे. दोघांसाठी हे मोठे आव्हान असेल आणि त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मदत करायची आहे.
सूर्यकुमार व्यतिरिक्त श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. टीम इंडिया महान खेळाडूंनी भरलेली आहे, त्यामुळे गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवसाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे सोपे नाही. त्यांना संघ आणि खेळपट्टीचा समतोल लक्षात घेऊन खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊया टीम इंडिया पहिल्या टी20 सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हन.
प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांची सलामीवीर म्हणून निवड होऊ शकते. या दोन्ही युवा खेळाडूंनी नुकतीच चांगली कामगिरी केली असून श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याकडून चांगली सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तो आक्रमक फलंदाज असून संघात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तो संघाचा कर्णधारही असून त्याच्याकडून महत्त्वाची खेळी खेळण्याची अपेक्षा आहे. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग फिनिशरच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणार आहे. तो एक उपयुक्त फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही आहे.
तर गोलंदाजीत रवी बिश्नोई हा प्रमुख फिरकी गोलंदाज असेल. तो एक तरुण खेळाडू आहे, परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वीच छाप पाडली आहे. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील. हा संभाव्य प्लेइंग इलेव्हन हा एक संतुलित संघ आहे ज्यामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सखोलता आहे. तथापि, अंतिम प्लेइंग-11 हे सामन्याच्या दिवशी नाणेफेक झाल्यावरच कळेल.
श्रीलंकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचे 5 ‘अमीरजादे’, फक्त लक्झरी कार आणि बाईकच नाही तर प्रायव्हेट जेटचे देखील आहेत मालक
सचिन तेंडूलकरही जो रुटपुढे काहीच नाही…! इंग्लंडच्या माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य
रोहित-कोहली नाही, ‘हा’ आहे बाबर आझमचा जगातील सर्वात आवडता खेळाडू