भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर भारताचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, दुसऱ्या वनडेत यजमान संघाने 6 विकेट्सने भारताला पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे, या दोन्ही सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली खेळले नव्हते. अशात दुसऱ्या सामन्यात विराट कोहली याच्याकडे एक नवीन काम दिले होते. विराटने हे काम करून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. ते काम म्हणजे, वॉटर बॉयचे. आता विराटचा पाणी घेऊन मैदानावर येतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
शनिवारी (दि. 29 जुलै) वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याला विश्रांती दिली होती. मात्र, तरीही विराट मैदानावर दिसला. झाले असे की, भारताच्या डावातील 37व्या षटकात जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला, तेव्हा विराट कोहली वॉटर बॉय (Virat Kohli Water Boy) बनून मैदानावर आला. तो यावेळी हातात पाण्याच्या बॉटल घेऊन मैदानावर आला होता. विराटसोबत यावेळी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) हादेखील होता. दोघांनीही शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना पाणी पाजले. अशात विराटचा हा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे. नेटकरी सोशल मीडियावर विराटच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. ते म्हणत आहेत की, “एवढा मोठा खेळाडू असूनही विराट कोहली मातीशी जोडला आहे.”
हेही नक्की वाचा- क्रिकेट जगतातील 5 महान खेळाडू, जे झाले होते वाॅटरबाॅय
एकाने विराटचा फोटो शेअर करत म्हटले की, “जगातील एकमेव वॉटर बॉय (Water Boy), ज्याच्या नावावर 25 हजार आंतरराष्ट्रीय धावा आणि 76 शतके आहेत. जेव्हा विराट कोहली वॉटर बॉय बनतो आणि संघसहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन जातो तेव्हाचा क्षण.”
Only waterboy in the world to have 25K international runs and 76 international centuries.
When Virat Kohli turned waterboy and carried drinks for the Team! 🙌#INDvWIpic.twitter.com/XJeANopF3s
— Anunay (@Anunay_Aanand) July 30, 2023
दुसऱ्या एकाने लिहिले की, “जगातील सर्वात महागडा वॉटरबॉय.”
The Most Expensive WaterBoy in the history of the Cricket! #ViratKohli pic.twitter.com/bNM9okYNLK
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) July 30, 2023
आणकी एकाने लिहिले की, “बीसीसीआयकडे किती जास्त पैसा आहे, त्यांनी विराट कोहलीला वॉटरबॉय बनवले आहे.”
https://twitter.com/shayarcaster/status/1685337109325135872
संघ व्यवस्थापनाचा डाव उलटला
भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण, विश्वचषकासाठी दावेदार खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध वेग, उसळी आणि फिरकीचा सामना करू शकले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ अवघ्या 40.5 षटकात 181 धावा करून बाद झाला.
यावेळी भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने 55 चेंडूत सर्वाधिक 55 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त शुबमन गिल यानेही 34 धावांचे योगदान दिले. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली. मात्र, ही भागीदारी तुटताच भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. यजमानांनी भारतीय संघाचे 182 धावांचे आव्हान अवघ्या 36.4 षटकात 4 विकेट्स गमावत पार केले आणि सामना जिंकला.
विराट कोहलीच्या 25 हजारांहून अधिक धावा
दुसऱ्या वनडेतूनही बाहेर बसलेल्या विराट कोहली याच्या कारकीर्दीवर एक नजर टाकली, तर समजते की, विराट किती मोठा खेळाडू आहे. विराटने त्याच्या कारकीर्दीत 25 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 111 कसोटी सामने खेळताना 49.3च्या सरासरीने 8676 धावा केल्या आहेत. यामध्ये 29 शतकांचा समावेश आहे. तसेच, 275 वनडेत त्याने 57.32च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत. यात 46 शतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 115 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 37.25च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. यातही विराटच्या नावावर एका शतकाचा समावेश आहे. (india vs west indies star cricketer virat kohli turns water boy after getting rested for 2nd odi)
महत्त्वाच्या बातम्या-
गजबच! ब्रॉड बनला अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा आठवा खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश
आता विश्वचषक विसरा! 247 दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात फेल ठरला संजू, नेटकरीही संतापले