भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज संघात चौथा टी20 सामना शनिवारी (12 ऑगस्ट) ला होणार आहे. पाच टी20 सामन्याच्या या मालिकेत वेस्ट इंडिज संघ 2-1 ने आघाडीवर आहे. भारतीय संघ आता मालिकेत बराबरी करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे. या सामन्या दरम्यान भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल एक विक्रम करू शकतो. चहल हा खूप चतूर गोलंदाज आहे. तो फलंदाजांना चकवण्यात नेहमी यशस्वी ठरतो. आता चहल पाकिस्ताचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीचा विक्रम मोडू शकतो. चहल या सामन्यात 100 टी20 आंरतराष्ट्रीय विकेट्स पुर्ण करण्याची शक्यता आहे.
युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या टी20 आंतरराष्ट्रीय प्रकारात विकेट्स घेणाच्या बाबतीत 11व्या क्रमांकावर आहे. त्याने 78 सामन्यात 95 बळी घेतले आहेत. चहलला 100 विकेट्स पुर्ण करण्यासाठी आता केवळ 5 खेळाडूंना बाद करायचे आहे. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) ला मागे टाकू शकतो. आफ्रिदीने 99 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत. जर चहलने वेस्ट इंडिज विरुद्ध जर 4 विकेट्स घेतल्या तर तो आफ्रिदीला मागे टाकेल.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम सध्या बांंगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने 117 सामन्यात 140 विकेट घेतल्या आहेत. तर, न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. सौदीने 107 सामन्यात 134 विकेट घेतल्या आहेत. अफगानिस्थानचा फिरकी गोलंदाज राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 82 सामन्यात 130 विकेट घेतल्या आहेत. जर आपण भारतीय फिरकीपटू चहलबद्दल बोललो तर, भारतीय संघासाठी तो सर्वाधिक टी20 विकेट घेणारा गोलंदाज आहे. सोबतच भुवनेश्वर कुमारने 87 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत. भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चौथ्या टी20 सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार/उमरान मलिक
वेस्ट इंडिज संघ
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर/रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅककॉय (india vs west indies yuzvendra chahal break the record of pakistani player)
महत्वाच्या बातम्या-
“ईशानची ती जागा नक्की करा”, वर्ल्डकपआधी दिग्गजाने दिला टीम इंडियाला सल्ला
“लोकांच्या भावना असतात तर…”, भारत-पाकिस्तान सामन्याविषयी हे काय बोलला हार्दिक?