राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रात 51 षटकात 3 बाद 232 धावांची मजल मारली आहे.
भारताकडून या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या 18 वर्षीय पृथ्वी शॉने शतक तर चेतेश्वर पुजाराने अर्धशतक केले आहे.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल शून्य धावेवरच पहिल्या षटकातच बाद झाला. त्याला गॅब्रियल शॅननने पायचीत बाद केले.
मात्र त्यानंतर शॉ आणि पुजाराने डाव सांभाळताना दुसऱ्या विकेटसाठी 206 धावांची द्विशतकी भागीदारी रचली. मात्र ही जोडी फोडण्यात शर्मन लेविसला यश आले. त्याने पुजाराला यष्टीरक्षक शेन डावरिचकडे झेल देण्यास भाग पाडले. पुजाराने 14 चौकारांसह 130 चेंडुत 86 धावा केल्या.
त्यानंतर काही वेळात शॉलाही देवेंद्र बिशूने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. शॉने या डावात 154 चेंडूत 134 धावांची खेळी करताना 19 चौकार मारले.
त्यानंतर पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला विराट कोहली 4 आणि अजिंक्य रहाणे शून्य धावेवर खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-






