---Advertisement---

…म्हणून गावस्कर म्हणाले, विराट कोहलीच्या जन्माआधीही जिंकत होती टीम इंडिया!

On: सोमवार, नोव्हेंबर 25, 2019 3:21 PM
---Advertisement---

कोलकाता। भारतीय क्रिकेट संघाने रविवारी(24 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात 1 डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा कसोटीमधील एका डावाने मिळवलेला सगल चौथा विजय होता. त्यामुळे सलग चार कसोटी एका डावाने जिंकणारा भारत पहिलाच संघ ठरला.

या सामन्यानंतर संघाच्या यशाबद्दल बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला, सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) काळात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील कठीण आव्हानांना तोंड द्यायला सुरुवात केली.

मात्र विराटच्या या विधानावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी (Sunil Gavaskar) नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की सध्याचा कर्णधार कोहलीचा जन्म नव्हता झाला तेव्हाही भारतीय संघ जिंकत होता.

कोलकाता कसोटीनंतर गावस्कर स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये म्हणाले, ‘हा एक विलक्षण विजय आहे, पण मला एक मुद्दा सांगायचा आहे.’

‘भारतीय कर्णधार म्हणाला की ही गोष्ट 2000 मध्ये दादाच्या (गांगुलीच्या) संघापासून सुरू झाली होती. मला माहित आहे की गांगुली बीसीसीआय अध्यक्ष आहे, त्यामुळे कदाचित कोहलीला त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगायच्या असतील. पण सत्तर आणि ऐंशीच्या दशकातही भारत जिंकत होता. कोहली त्यावेळी जन्मलाही नव्हता.’

गावस्कर पुढे म्हणाले, ‘बर्‍याच लोकांना असे वाटते की क्रिकेट फक्त 2000च्या दशकातच सुरू झाले. पण भारतीय संघाने सत्तरच्या दशकात परदेशात विजय मिळवला आहे. 1986मध्येही भारतीय संघ परदेशात विजयी झाला आहे. तसेच भारताने परदेशात मालिका अनिर्णितही राखल्या आहेत. इतर संघांप्रमाणेच त्यांचाही पराभव झाला.’

विराटने केले होते हे विधान-

विराट कोलकाता सामन्यानंतर म्हणाला होता की ‘आता आम्ही उभे राहणे शिकले आहे. हे सर्व दादा (सौरव गांगुली) च्या युगात सुरु झाले, जे आम्ही आता पुढे नेत आहोत. आता आमची गोलंदाजी फळी निर्भय आहे आणि कोणत्याही फलंदाजासमोर गोलंदाजी करताना त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. आम्ही गेल्या 3-4 वर्षांत केलेल्या सर्व कष्टाचे फळ आम्हला मिळत आहे.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---