भारतीय संघ टी-२० विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघांचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, ऑस्ट्रेलियाचा संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी प्रथम भारत दौऱ्यावर येईल. यानंतर भारत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा मुख्य संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. पण दुसरा भारतीय संघ वनडे मालिकेत भाग घेणार आहे.
भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी मोहाली (२० सप्टेंबर), नागपूर (२३ सप्टेंबर) आणि हैदराबाद (२५ सप्टेंबर) येथे होणार आहे. भारतीय संघ तिरुवेंद्रम (२८ सप्टेंबर), गुवाहाटी (१ ऑक्टोबर) आणि इंदूर (३ ऑक्टोबर) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी तीन टी२० सामने खेळून विश्वचषक तयारी पूर्ण करेल. रांची (६ ऑक्टोबर), लखनौ (९ ऑक्टोबर) आणि दिल्ली (११ ऑक्टोबर) येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.
बीसीसीआय कोविड-१९ मुळे पुढे ढकललेली प्रलंबित मालिका संपवत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुर्गापूजेदरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी येत आहे, ज्यामध्ये द्वितीय श्रेणीचा भारतीय संघ खेळताना दिसणार आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आमचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे, आमच्याकडे समान ताकदीचे दोन राष्ट्रीय संघ उपलब्ध आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संघ टी-२० विश्वचषकासाठी रवाना होत असतानाच तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, “रोटेशन धोरणानुसार, एकदिवसीय सामना कोलकाता येथे होणार होता, परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशन दुर्गापूजेच्या वेळी उत्सवादरम्यान पोलीस बंदोबस्त करू शकणार नाही. त्यामुळे एक सामना दिल्लीला देण्यात आला आहे.”
दरम्यान, या दोन्ही मालिका भारतीय संघासाठी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत. या मालिकेतून भारतीय संघाला विश्वचषकात खेळण्यास खेळाडू किती परिपूर्ण आहेत याचा अंदाज येईल. त्यामुळे या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ स्पूर्ण ताकदीनिशी उतरेल अशी अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvWI। पहिल्या सामन्यातून उपकर्णधारच बाहेर, वाचा कोण घेणार संघात जडेजाची जागा?
‘भारतीय संघ युवा असेल तरी….’ वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वीच कर्णधार शिखर धवनने दिला कानमंत्र
तर ठरलं! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धांची वापसी; या तारखांना होणार सुरुवात