पुढील महिन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळण्यासाठी एजबॅस्टनच्या रोझ बाऊल मैदानात उतरेल. त्यावेळी भारतीय संघ आपल्या जवळपास ८९ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) कसोटी दर्जा प्राप्त झालेल्या १२ देशांपैकी अद्यापी फक्त दोन देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळला नाही. यात भारताव्यतिरिक्त बांगलादेशचा समावेश आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे होणार असून तो दोन्ही संघांसाठी हे त्रयस्थ ठिकाण असेल.
पाकिस्तानमधील सुरक्षेचा धोका लक्षात घेता, एका दशकापेक्षा जास्त काळ परदेशी संघ तेथे गेले नाहीत. दरम्यान पाकिस्तानने घरच्या मैदानांवरील सामने युएई आणि श्रीलंका येथे खेळले. याव्यतिरिक्त बहुतेक देशांना तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यात न्यूझीलंडचा समावेश आहे. ज्यांनी २०१४ ते २०१८ पर्यंत तटस्थ ठिकाणी सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन जिंकले आणि दोन गमावले. २००७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामने खेळलेले नाहीत.
यापूर्वी, भारताला १९९९ मध्ये तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळण्याची संधी होती. परंतु, ढाका येथे खेळल्या जाणार्या आशियाई कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात भारतीय संघ अपयशी ठरला होता. पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी त्या चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि त्यांनी प्रथमच तटस्थ ठिकाणी एक कसोटी सामना खेळला. तसे पाहायला गेले तर, तटस्थ ठिकाणी पहिला कसोटी सामना १०९ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २७-२८ मे १९१२ रोजी मॅनचेस्टर येथे खेळला गेला होता. हा सामना तिरंगी कसोटी मालिकेचा भाग होता. या दोन संघांव्यतिरिक्त यजमान इंग्लंड मालिकेचा भाग होता. ऑस्ट्रेलियाने दोन दिवसात एक डाव आणि ८८ धावांनी सामना जिंकला.
तटस्थ ठिकाणी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने आतापर्यंत तटस्थ ठिकाणी ३९ सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी १९ जिंकले आहेत आणि १२ गमावले आहेत. उर्वरित आठ सामने अनिर्णित राहिले. ऑस्ट्रेलियाने तटस्थ ठिकाणीही १२ सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ श्रीलंका (९), दक्षिण आफ्रिका (७) आणि न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड (प्रत्येकी ६) यांचा क्रमांक लागतो. अफगाणिस्तानने आपले चार सामने तटस्थ ठिकाणी (भारत आणि युएई) देखील खेळले आहेत. झिम्बाब्वेने आपले दोन्ही सामने अफगाणिस्तानविरुद्ध अबूधाबी येथे खेळले. आयर्लंडने आपला एक सामना अफगाणिस्तानविरुद्ध देहरादूनमध्ये खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्जन नागवासवालाचा मोठा खुलासा, प्रारंभीच्या काळात या भारतीय गोलंदाजाची करायचा कॉपी
व्हिडिओ : कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोहलीची विकेट घेणार का? साउदीने दिले ‘हे’ उत्तर






