महिला प्रीमियर लीग (WPL)) संपल्यानंतर भारतीय महिला बऱ्याच कालावधीनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा एकदिवसीय सामना आहे. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरुवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतानं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पूर्ण केला. तिनं आफ्रिकेविरुद्ध 28व्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेऊन हा विक्रम नोंदवला.
याआधी भारताची माजी दिग्गज खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा करण्याचा विक्रम नोंदवला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली होती. त्यानंतर स्मृती मानधनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पूर्ण केला आणि 7000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला ठरली.
यासोबतचं तिनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6व्या शतकाची देखील नोंद केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिनं वयक्तिक 7वे शतक झळकावलं.
स्मृती मानधनानं (Smriti Mandhana) 6 कसोटी, 83 एकदिवसीय, 133 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 7000 धावांचा टप्पा गाठला. तिन 6 कसोटी सामन्यांमध्ये 440 धावा ठेकल्या आहेत. त्यामध्ये तिनं 1 शतक तर 2 अर्धशतक झळकावलं आहे. तर 83 एकदिवसीय सामन्यात तिनं 26 अर्धशतक तर 6 शतकं झळकावली आहेत. 133 आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिनं 3220 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर 8 मध्ये भारताला ‘या’ दोन संघांपासून सावध राहावं लागेल, माजी खेळाडूचा इशारा
रोहित शर्मासोबत सर्वकाही ठीक आहे का? शुबमन गिलची इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
‘फादर्स डे’च्या निमित्त अनुष्काची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, रिंकूनेही दिल्या वडिलांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा!