टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि जर्मनी संघात पूल एमधील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा निराश केले. जर्मनी संघाने शानदार कामगिरी करत भारतीय संघाला २-० ने पराभूत केले.
जर्मनीच्या नाइके लॉरेंझने पेनल्टी स्ट्राइकला स्कोरमध्ये बदलत आपल्या संघाला भारताविरुद्ध आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनी भारताविरुद्ध १-०ने पुढे होता. पुढे जर्मनीने हाफटाईम ब्रेकपर्यंत भारताविरुद्धची १-०ची आघाडी कायम ठेवली होती. यादरम्यान भारतासाठी एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे जर्मन संघाच्या खेळाडूंना आपल्या गोलपोस्टपासून दूर ठेवले होते. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्हीही संघांना एकही गोल करता आला नाही. (India Women vs Germany Women Hockey Score Tokyo Olympics 2020 Germany Won By 2-0)
असे असले, तरीही नंतर ऍने श्रॉडरने शानदार फिल्ड गोल करून जर्मनीला २-० ने आघाडी मिळवून दिली. तिसरा क्वार्टर संपेपर्यंत जर्मनीने आपली आघाडी कायम राखली होती.
#TeamIndia manage to block the German team to a solo-goal lead in the first half.
Time to go a step higher in the second period. 💪#GERvIND #IndiaKaGame #TokyoTogether #Tokyo2020 #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/cGLOv4vzuF
— Hockey India (@TheHockeyIndia) July 26, 2021
भारतीय संघ शेवटच्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करण्यास अपयशी ठरला. खेळ संपण्याच्या १० मिनिटापूर्वीच भारताला धक्का बसला. भारताची शर्मिला देवी हिला येलो कार्ड मिळाले. त्यामुळे तिला रेफरीने ५ मिनिटांसाठी बाहेर पाठवले होते. त्यामुळे भारतीय संघाला १० खेळाडूंसोबतच खेळावे लागले होते.
आपल्या सुरुवातीच्या सामन्यात भारतीय संघाला नेदरलँडविरुद्ध १-५ ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता भारतीय महिला हॉकी संघाचा टोकियो ऑलिंपिकमधील सलग पराभव आहे.
भारतीय महिला हॉकी संघाचा पूल एमधील तिसरा सामना बुधवारी (२८ जुलै) ग्रेट ब्रिटनविरुद्ध होणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?
-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका