भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघातील तीन टी-२० सामन्यांचा दुसरा सामना शनिवारी (२५ जून) खेळला गेला. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने विजयी मिळवला होता आणि शनिवारी संघाने दुसरा सामना देखील जिंकला. सलग दोन विजयांनंतर भारतीय महिला संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली.
श्रीलंकन संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली होती, पण त्यांना सामना मात्र जिंकता आला नाही. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. श्रीलंकन संघाच्या सलामीवीर विष्मी गुणरत्ने आणि चमारी अथपथु यांनी संघाला चांगली सुरुवात दिली, पण त्यानंतर त्यांची एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकली नाही. या दोघांनी अनुक्रमे ४५ आणि ४३ धावा केल्या. २० षटकांमध्ये श्रीलंकन संघाने ७ विकेट्स गमावल्या आणि अवघ्या १२५ धावा उभ्या करू शकले.
प्रत्युत्तरात भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे वाटत होते, पण त्यांना देखील शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. सलामीवीर स्मृती मंधानाने ३४ चेंडूत सर्वाधिक ३९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शेफाली वर्मा आणि सबभीने मेघना यांनी प्रत्येकी १७ – १७ धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३२ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. तर दीप्ती शर्मा देखील नाबाद ५ धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर होती.
https://twitter.com/BCCIWomen/status/1540666603238436865?s=20&t=o2o2gN3VmyHW2VJG7klvRQ
दीप्ती शर्माने गोलंदाजी करताना देखील महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. राधा यादव, पूजा वस्त्रकार, रेणुका सिंग आणि हमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांच्या या प्रदर्शनामुळेच श्रीलंकन संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. परिणामी भारताने टी-२० मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवला. मालिकेतील शेवटचा सामना २७ जून रोजी खेळला जाणार आहे. उभय संघात या टी-२० मालिकेनंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाणार आहे.
दरम्यान, नुकतीच भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. तिच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची ही पहिलीच मालिका आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी संघाची नवनिर्वाचित कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मिताली शिवाय ही मालिका कठीण जाईल असे विधान केले होते. मात्र, भारताने मालिा एकतर्फी जिंकली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट
एका शॉटने अख्खा भारताला पराभवाच्या खाईत लोटणारा डग्लस मरिलीयर
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने रणजी फायनल सुरू असलेल्या स्टेडियममध्ये सहज मारला फेरफटका, कॅमेरात झाला कैद






