दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट

दिनेश कार्तिकप्रमाणे धडाकेबाज पुनरागमन करू पाहणारा मुरली विजय सपशेल फ्लॉप, एकेरी धावेवर आऊट

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज मुरली विजयने आता मोठ्या काळानंतर क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले आहे. मुरली तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये त्रिची वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. डिंडीगुल ड्रॅगंस संघाविरुद्धच्या सामन्यात तो खेळला, पण काही खास कामगिरी करू शकला नाही. असे असले तरी त्याचा संघाने सामना मात्र जिंकला. आगामी काळातील सामन्यांमध्ये त्याच्याकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत.

त्रिची वॉरियर्स विरुद्ध डिंडीगुल ड्रॅगंस या सामन्यात मुरली विजय (Murali Vijay) दोन आकडी धावसंख्या देखील गाढू शकला नाही. यापूर्वी भारतीय कसोटी संघासाठी डावाची सुरुवात करणारा मुलरी या सामन्यात त्रिची वॉरियर्ससाठी १३ चेंडू खेळला आणि यामध्ये अवघ्या ८ धावा करून बाद झाला. मुरली जरी या सामन्यात अपयशी ठरला असला, तरी त्याचा संघ त्रिचीने ८ विकेट्स राखून सामन्यात विजय मिळवला.

दरम्यान,  मुरली विजयने मागच्या दोन वर्षांमध्ये एकही सामना खेळला नव्हता, पण आता तो पुन्हा एकदा मैदानात परतला आहे. त्याने शेवटचा सामना सीएसकेसाठी सप्टेंबर २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला होता, जो यूएईत पार पडला होता. रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याने मोठ्या काळापासून सहभाग घेतला नाहीये. तामिळनाडूच्या रणजी संघासाठी त्याने शेवटचा सामना डिसेंबर २०१९ मध्ये खेळला होता. भारतीय संघासाठी त्याने शेवटचा सामना २०१८ मध्ये खेळला होता. त्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता आणि पर्थमध्ये सामना पार पडलेला.

तामिळनाडू प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात जरी मुरली स्वतःची छाप पाडू शकला नसला, तरी येणाऱ्या पुढच्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. त्याला स्वतःला देखील असेच वाटते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुरली म्हणाला होता की, “मला मोठ्या काळापर्यंत खेळायचे आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.”

मुरली विजयच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी ६१ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे, यात त्याने ३९८२ आंतरराष्ट्रीय धावांची नोंद स्वतःपुढे केली. यादरम्यान १२ शतके आणि १५ अर्धशतके देखील त्याने ठोकली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भावानं नाद केलाय! टी२० ब्लास्टमध्ये झंझावाती फलंदाजी करत केवळ ‘इतक्या’ चेंडूत ठोकलंय शतक

सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने रणजी फायनल सुरू असलेल्या स्टेडियममध्ये सहज मारला फेरफटका, कॅमेरात झाला कैद

‘जडेजा टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाचा दावा

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.