मागील ७ महिन्यांपासून भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सरावालाही ब्रेक लागला होता. तरी लॉकडाऊन-५ नंतर खेळाडूंना सराव सुरु करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने टोकियो ऑलिंपिक क्वालिफायरच्या तयारीच्या दृष्टीने साई सेंटर, लखनऊ येथे २६ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय महिला कुस्ती शिबिर सुरू करण्याची घोषणा केली.
त्यामुळे साई सेंटर, लखनऊ येथे सोमवारी(२६ ऑक्टोबर) भारताच्या स्टार महिला कुस्तीपटू सराव सुरु करताना दिसून आल्या. भारतीय कुस्ती संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली दिव्या काकरान, विनेश फोगट आणि पूजा ढांडा यांच्यासह 11 कुस्तीपटूंनी दीर्घ सराव सत्रात भाग घेतला.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार रिओ ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकसह पाच कुस्तीपटूंनी २५ ऑक्टोबरला साई सेंटर, लखनऊ येथे हजेरी लावली. साई सेंटरचे संचालक संजय सारस्वत यांनी सांगितले की हे सर्व खेळाडू रविवारी सायंकाळी पाच वाजता आले. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार साक्षीसह इतर कुस्तीपटूंना पुढील सहा दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल, सातव्या दिवशी कोरोना टेस्ट होईल. हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच या सर्वांना शिबिरात सहभागी होण्याची परवानगी देण्यात येईल.
६ नोव्हेंबर रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनच्या आगामी बैठकीत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक तयार केले जाईल. त्याशिवाय यावर्षी डिसेंबरमध्ये सर्बियात होणाऱ्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीपबद्दल निर्णयही या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्याच आधारे भारतीय महिला कुस्ती संघाच्या ट्रायल्सची घोषणाही केली जाईल.
राष्ट्रीय महिला कुस्ती शिबिरात सहभागी होणाऱ्या कुस्तीपटू –
५० कि.ग्रॅ. – निर्माला आणि अंकुश, ५३ कि.ग्रॅ – विनेश फोगट, अंजू आणि पिकी, ५७ कि.ग्रॅ – सरिता, अंशू आणि पूदा ढांडा, ६२ कि. ग्रॅ – सोनम,६८ कि.ग्रॅ – दिव्या आणि अनिता.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी
मनजीत आणि सुशील कुमारची कुस्तीत दोस्ती!
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया