भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ पूर्वी त्यांच्या दुसऱ्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा ८१ धावांनी पराभव केला. भारताने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २५८ धावा केल्या होत्या. सलामीवीर स्मृती मंधानाने ६६ आणि दीप्ती शर्माने ५१ धावा केल्या. त्यानंतर पूजा वस्त्राकरच्या (३/२१) नेतृत्वाखाली गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर ९ बाद १७७ धावाच करता आल्या. यासोबतच विश्वचषकापूर्वी भारताची जोरदार तयारी झाली आहे. या दोन सामन्यांपूर्वी भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शेवटचा एकदिवसीय सामनाही जिंकला होता. अशा स्थितीत टीम इंडियाने सलग तीन वनडे जिंकले आहेत. विश्वचषकातील त्यांचा पहिला सामना ६ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ या सामन्यात आघाडी घेताना दिसला नाही. झंझावाती फलंदाज डायंड्रा डॉटिन केवळ एक धाव काढून परतली. झुलन गोस्वामी आणि मेघना सिंग यांनी वेस्ट इंडिज संघाला सुरुवातीपासूनच दडपण ठेवले होते. पहिल्या तीन षटकांत केवळ एक धाव झाली. त्यामुळे डॉटिन बाद झाली. वेस्ट इंडीज संघाला १० षटकात २७ धावा करता आल्या. आलिया ऍलन (१२) ही धावा निघत नसल्याने दबावामुळे माघारी परतली. ती पूजा वस्त्राकरची पहिली बळी ठरली. कर्णधार स्टेफनी टेलर (८), केसेनिया नाइट (२३) यांनाही फार काही करता आले नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजची अवस्था चार बाद ५३ अशी झाली होती.
हेली मॅथ्यूज (४४) आणि कॅम्पबेल (६३) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये पाचव्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी झाली. मात्र, या धावा अतिशय संथ गतीने झाल्या. त्यानंतर मेघना सिंगने मॅथ्यूजला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी चेडेन नेशन (१), चिनेल हेन्री (८) आणि चेरी ऍन फ्रेझर (६) यांना बाद करून भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून पूजाने तीन, मेघना, राजेश्वरी आणि दीप्तीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. झुलन गोस्वामीला एकही विकेट मिळाली नाही. मात्र, तिने ८ पैकी दोन षटके निर्धाव टाकताना केवळ १४ धावा दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)