---Advertisement---

आनंदाची बातमी! ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

On: शनिवार, जुलै 31, 2021 7:59 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या नवव्या दिवशी (३१ जुलै) भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला हॉकी संघाने ४-३ ने जिंकला होता. यावेळी भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता आता सत्यात उतरली आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

झाले असे की, शनिवारी (३१ जुलै) महिला हॉकी स्पर्धेचा पूल एमधील शेवटचा सामना ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड महिला संघात झाला. या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला २-० ने धूळ चारली. यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने अव्वल चारमधील आपले स्थान सुरक्षित केले. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पात्र ठरला आहे. (India women’s hockey team qualifies for quarterfinals after Great Britain beat Ireland 2-0)

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1421466929621913603

भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्यपूर्व सामना सोमवारी (२ ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघाविरुद्ध होणार आहे.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान भारताकडून वंदना कटारियाने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला. या सामन्यात वंदनाने कमालीचे प्रदर्शन केले. तिने सलग चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला तीन गोल केले. यासह वंदना ही ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी भारताची पहिली महिला हॉकी खेळाडू बनली.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-हॉकीमध्ये भारतीय महिलांचा दमदार विजय; वंदना बनली ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक

-भारताच्या आशा धूळीत! अव्वल बॉक्सर अमित पंघलला रिओ ऑलिंपिक विजेत्या मार्टिनेझने दिली ऑलिंपिक पदार्पणात मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---