---Advertisement---

कोहली-रोहितच्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम

On: रविवार, फेब्रुवारी 3, 2019 3:47 PM
---Advertisement---

वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज(3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना वेस्टपॅक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 35 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली आहे.

त्यामुळे भारतीय संघाने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये वनडे मालिकेत 4 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी 2009 च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताला सर्वाधिक 3 वनडे सामने जिंकता आले होते.

आज भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताने पहिले चार विकेट्स 18 धावांवरच गमावले. मात्र त्यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

रायडूने 90 धावा करताना 8 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शंकर 45 धावांवर बाद झाल्यानंतर केदार जाधव बरोबर सहाव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.

केदारने 34 धावा तर शेवटच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी करताना 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने 49.5 षटकात सर्वबाद 252 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4, ट्रेंट बोल्टने 3 आणि जिमी निशामने 1 विकेट् घेतली.

मात्र भारताने दिलेल्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 44.1 षटकात सर्वबाद  217 धावाच करता आल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने 3, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 आणि भुवनेश्वर कुमारने 1 विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड विरुद्ध एमएस धोनीच्या बाबतीत ९ वर्षांनंतर घडली ती नकोशी गोष्ट

३६ वर्षानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या बाबतीत घडली ही गोष्ट

रायडू-विजय जोडी चमकली, संघाला संकटातून बाहेर काढताना केला हा मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment