रंगीरी डंबुला इंटरनेशनल स्टेडियममध्ये आज श्रीलंकेविरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला श्रीलंकेमधील नाणेफेक जिंकण्याचा विक्रम कायम राखत पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आहे.
श्रीलंकेला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करून डंबुलाच्या मैदानावरील गोलंदाजांना अनुकूल परिस्तिथीचा फायदा घेऊन श्रीलंकेच्या फलंदाजांना लवकर बाद करण्याचा पर्यंत भारतीय गोलंदाज करतील. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनला एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिल्यामुळे अक्षर पटेल आणि यज्वेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे. तर चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुल फलंदाजीसाठी संधी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बूमरा या गोलंदाजांवर आहे. बाकी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच राहील.
श्रीलंकेचा लसिथ मलिंगासाठी हा सामना खूप अविस्मरणीय असणार आहे कारण हा त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील २००वा सामना असणार आहे.
श्रीलंकेच्या संघाचा प्रयत्न असेल की कसोटीत झालेल्या पराभवाल विसरून एकदिवसीय मालिकेत एक नवीन सुरुवात करून मालिका संघर्षात्मक बनवावी तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीच्या भारतीय संघ कसोटी प्रमाणेच एकदिवसीय मालिकेत हि वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, एमएस धोनी (डब्ल्यू), केदार जाधव, हार्डिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बूमरा, यज्वेंद्र चहल
श्रीलंका: निरोशन डिकवेल, दानुस्का गुनाथिलका, कुसल मेंडिस, उपुल थरंगा (कर्णधार), एंजेलो मैथ्यूज, चामरा कपुगेदेरा, वानुडू हसरंगा, थिसारा परेरा, लक्ष्मण सैंडकन, विश्व फर्नांडो, लसिथ मलिंगा