गयाना। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात आजपासून(7 ऑगस्ट) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज प्रोविडन्स स्टेडीयम, गयाना येथे होणार आहे.
या सामन्याला पावसाच्या व्यत्ययामुळे उशीर झाला असून हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. तसेच कुलदीप यादव, केदार जाधव, खलील अहमद यांनाही आज संधी देण्यात आली आहे. मात्र के एल राहुल, नवदीप सैनी, मनीष पांडे आणि युजवेंद्र चहल यांना आज 11 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.
तसेच वेस्ट इंडीज संघात सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलचा समावेश झाला आहे. या वनडे मालिकेत वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व जेसन होल्डर करणार आहे.
2019 विश्वचषकानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ वनडे क्रिकेट खेळणार आहेत.
आत्तापर्यंत या दोन संघांमध्ये 127 वनडे सामने झाले आहेत. यातील 60 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर 62 सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 2 सामने बरोबरीत सुटले आहेत आणि 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद.
वेस्ट इंडीज – इव्हिन लुईस, ख्रिस गेल, शाय होप (यष्टिरक्षक), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, रोस्टन चेस, जेसन होल्डर (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, फॅबियन अॅलेन, शेल्डन कोट्रेल, केमार रोच
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का!
–रोहितने अतिशय कष्टाने केलेला तो विक्रम आज धोक्यात
–‘चायनामन’ कुलदीप यादवला शमी, बुमराहचा हा खास विक्रम मागे टाकण्याची सुवर्णसंधी