केपटाऊन| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात रविवार रोजी (२३ जानेवारी) वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकत यजमानांना मालिका क्लिन स्वीप करण्याची संधी असेल. तर पाहुणे व्हाईटवॉशपासून वाचण्यासाठी आणि दौऱ्याचा विजयी शेवट करण्यासाठी झगडतील. तत्पूर्वी १.३० वाजता दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाली. भारताचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आहे.
#TeamIndia win the toss and elect to bowl first in the final ODI.
Live – https://t.co/2aNhtssexO #SAvIND pic.twitter.com/Mwd4qaHi9s
— BCCI (@BCCI) January 23, 2022
भारत संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
दक्षिण आफ्रिका संघ-
जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा(कर्णधार), एडम मार्कराम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेविड मिलर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, ड्वेन प्रिटोरियस, लुंगी एनगिडी, सिसांडा मगला