आशिया चषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ हे पुन्हा आमने- सामने येणार आहेत. हा सामना 2 सप्टेंबरला श्रीलेंकेत होणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना टी20 विश्वचषकात खेळला होता. यात विराट कोहलीच्या जोरावर भारताने विजय प्राप्त केला होता. विराट पाकिस्तान विरुद्ध नेहमी आक्रमक अंदाजात खेळत असतो. या कारणाने अगामी आशिया चषकातील सामन्यासाठी भारतीय संघाला विराट कडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
विराट कोहली (Virat Kohli) ने पाकिस्तानविरुद्ध सतत धावा केल्या आहेत. त्याने टी20 आणि वनडे या दोन्ही प्रकारात आपले नाव गाजवले आहे. विराटची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ही पाकिस्तानविरुद्धच आहे. दरम्यान 2 सप्टेंबरला आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे. विराटच्या पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या पाच डावांबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
विराट कोहलीने 2009 ते 2019 पर्यंत पाकिस्तानविरुद्ध 13 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 536 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 96.22 आहे, तर सरासरी 48.72 आहे. ज्यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या शानदार फलंदाजीवरून याचा अंदाज येतो की, विराट पाकिस्तान विरुद्ध का महत्वाचा खेळाडू आहे.
आशिया चषकात विराटच्या नावावर शतक
आशिया चषकातही विराट कोहलीची बॅट पाकिस्तानविरुद्ध जोरदार धावत असते. 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने 183 धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती, जी त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्याही आहे. विराट कोहलीने आशिया चषकात एकदिवसीय प्रकारात पाकिस्तानविरुद्ध तीन डावात 206 धावा केल्या आहेत. 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध विराटच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
पाकिस्तानविरुद्ध विराटचे शेवटचे पाच सामने
2019 मध्ये विराटने मँचेस्टरमध्ये टी20 मध्ये आक्रमक 77 धावांची इनिंग खेळली.
2017 मध्ये विराटने ओव्हलवर पाकिस्तानविरुद्ध केवळ 5 धावांची इनिंग खेळली होती.
2017 मध्ये बर्मिंगहॅममध्ये विराटची बॅट जोरात चालली आणि त्याने संघासाठी 81 ठोकल्या होत्या.
2015 च्या विश्वचषकात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 107 धावांची शानदार खेळी केली होती.
2014 मध्ये विराटने मीरपूरमध्ये पाच धावांची इनिंग खेळली होती. (indian batsman virat kohli last five innings reecord against pakistan)
महत्वाच्या बातम्या-
‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य
बोंबला! World Cup 2023 तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश, भारतीय सामन्यांची बुकिंग कधी?