---Advertisement---

सचिन-विराट नाही! इंग्लंडमध्ये ‘या’ दिग्गजाने झळकावली सर्वाधिक कसोटी शतके!

On: गुरूवार, जून 19, 2025 2:06 PM
Sachin Tendulkar, Rahul Dravid
---Advertisement---

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या रोमांचक कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. हा सामना इंग्लंडमधील ऐतिहासिक हेडिंग्ले (लीड्स) मैदानावर खेळला जाईल आणि याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 (WTC 2025-27) च्या नवीन चक्राचाही आरंभ होईल. आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर एकूण 28 भारतीय फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावली आहेत. पण, या यादीत टाॅपला सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीचा समावेश नाही. चला तर या यादीवर एक नजर टाकूयात.

राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये खेळलेल्या 13 कसोटी सामन्यांच्या 23 डावांमध्ये 68.80च्या शानदार सरासरीने 1,376 धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतके आणि 4 अर्धशतके समाविष्ट आहेत. विशेष बाब म्हणजे, 2011 मध्ये त्याच्या शेवटच्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने सलग 3 शतके झळकावली होती.

या यादीत दुसऱ्या स्थानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 17 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 1,575 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर इंग्लंडमध्ये 4 शतके आणि 8 अर्धशतके आहेत. तसेच, माजी दिग्गज फलंदाज दिलीप वेंगसरकर देखील या यादीत समाविष्ट आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये 4 शतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे, या यादीत 2 माजी गोलंदाज अजित आगरकर आणि अनिल कुंबळे यांचाही शतकवीरांमध्ये समावेश होतो. आगरकरने 2002 मध्ये लॉर्ड्सवर नाबाद 109 धावा केल्या होत्या, तर कुंबळेने 2007 मध्ये ओव्हलमध्ये नाबाद 110 धावांची अविस्मरणीय खेळी खेळली होती.

सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, रिषभ पंत (Rishabh Pant), केएल राहुल (KL Rahul), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या यादीत शतक ठोकणाऱ्या सक्रिय फलंदाजांमध्ये (Active Batsmen) समाविष्ट आहेत. पण, पुजारा आणि रहाणे यावेळी भारतीय संघाचा भाग नाहीत. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की, यावेळी कोणता भारतीय फलंदाज इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर नवा इतिहास रचतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---