---Advertisement---

अरेरे! दुसऱ्या टी२० सामन्यात चहल ठरला महागडा, ‘या’ नकोशा यादीत पटकावले अव्वल स्थान

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (६ डिसेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, हा निर्णय भारतीय संघाच्या अंगलट आला. ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९४ धावा काढल्या. यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडच्या ५८ धावांचा मोलाचा वाटा होता. परंतु या डावात एका भारतीय गोलंदाजाच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. फिरकीपटू युझवेंद्र चहल भारतातर्फे टी-२० सामन्यांत सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा देणारा गोलंदाज ठरला.

चहलने तिसर्‍यांदा दिल्या ५० हून अधिक धावा

फिरकीपटू युझवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आजच्या सामन्यात ४ षटकांत ५१ धावा दिल्या. कारकिर्दीत तिसर्‍यांदा टी-२० सामन्यात चहलने ५० हून अधिक धावांची खैरात केली. यापूर्वी चहलने २०१७ साली इंदोर येथे श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात ५२ धावा दिल्या होत्या. तसेच २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियन येथील टी-२० सामन्यात त्याने ६४ धावा दिल्या होत्या.

आजच्या सामन्यातही ५१ धावा दिल्याने भारताकडून टी-२० सामन्यात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा देणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. या यादीत डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

सर्वाधिक टी-२० सामन्यात वेळा ५० हून अधिक धावा देणारे भारतीय गोलंदाज –

३ सामने* – युजवेंद्र चहल
२ सामने – मोहम्मद सिराज, कृणाल पंड्या

महत्त्वाच्या बातम्या-

‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video

‘हे हिंदू गद्दार आहेत…’, शेतकरी आंदोलनात युवराज सिंगच्या वडिलांचे वादग्रस्त विधान; Video जोरदार व्हायरल

VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर

ट्रेंडिंग लेख-

मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---