नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये शनिवारी (25 मार्च) भारतासाठी दोन सुवर्णपदके आली. आघाडीच्या भारतीय महिला बॉक्सर नीतू घंघास व स्वीटी बुरा यांनी आपापल्या गटात सुवर्णपदके नावे केली.
GOLD 🥇 It is for India’s Nitu Ghanghas 💥 First Gold of the day for India 🇮🇳 #WBCHDelhi #WorldChampionships pic.twitter.com/MTKwzwL5ln
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 25, 2023
नवी दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत नीतूचा 48 किलोग्रॅम वजनी गटातील अंतिम फेरीतील सामना मंगोलियाच्या लुतसाइखान अल्तानसेतसेग हिच्याविरुद्ध झाला. नीतूने एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात अल्तानसेतसेगचा 5-0 असा पराभव केला. नीतूने मागील वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देखील पदक जिंकले होते. तसेच तिने यापूर्वी दोन वेळा युवा जगज्जेती होण्याचा मान मिळवला आहे.
𝐒𝐄𝐂𝐎𝐍𝐃 𝐆𝐎𝐋𝐃 🥇 𝐅𝐎𝐑 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 🇮🇳
SAWEETY BOORA beat Lina Wang of China in the FINAL 🥊#WorldChampionships #WWCHDelhi #Boxing #WBC2023 #WBC @saweetyboora @BFI_official @Media_SAI @kheloindia pic.twitter.com/TUHqBhfUvf
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 25, 2023
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताची बॉक्सर स्वीटी बुराने अनपेक्षितपणे विजेतेपदाला गवसणी घातली. अनुभवी स्वीटीने 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लिनला 4-3 असे पराभूत करत विश्वविजेती बनली. स्वीटीला 2014 मध्ये झालेल्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेले. मात्र, यावेळी तिने विजेतेपदाला गवसणी घातली.
भारताकडून यापूर्वी एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी, लेखा केसी, निखत झरीन यांनी विश्वविजेत्या होण्याचा मान मिळवला होता.
(Nitu Ghanghas And Saweety Boora Won Gold In Womens Boxing Championship)