भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. बुधवारी (३० जून) या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला ५ गडी राखून पराभूत केले आहे. पराभवाच्या या धक्क्यानंतर भारतीय संघासाठी अजून एक वाईट बातमी पुढे आली आहे. भारतीय संघाची अनुभवी कर्णधार आणि मुख्य फलंदाज मिताली राज हीला दुखापतीमूळे आगामी सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली आहे.
या मालिकेत इंग्लंड संघ २-० ने पुढे आहे. अशा परिस्थितीत दुसरा वनडे सामना चालू असताना भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिला सामना सुरू असताना गळ्यामध्ये अचानक वेदना झाली होती. ज्यामुळे तिला आगामी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. तिच्याऐवजी भारतीय संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरला देण्यात आले आहे. तर मिताली राजऐवजी राधा यादव भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. (Indian captain mithali Raj ruled out of Third match against England)
UPDATE: Captain Mithali Raj has pain in her neck and will not take the field. Vice-captain Harmanpreet Kaur will lead the team in Mithali’s absence. Radha Yadav is the substitute fielder.#TeamIndia #ENGvIND pic.twitter.com/aBWtL53pd0
— BCCI Women (@BCCIWomen) June 30, 2021
मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ५० षटक अखेर २२१ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये कर्णधार मिताली राजने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली होती. तसेच शेफाली वर्मा हीने ४४ धावांचे योगदान दिले होते. तर स्म्रिती मंधनाने २२ धावांची खेळी केली होती. इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना केट क्रॉसने ३४ धावा खर्च करत सर्वाधिक ५ गडी बाद केले होते.
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, सोफिआ डंकलेने नाबाद ७३ धावांची खेळी केली. तर लॉरेन विनफिल्ड हीलने ४२ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच कॅथरीन ब्रंटने नाबाद ३३ धावांची खेळी करत इंग्लंड संघाला सामना जिंकून दिला. इंग्लंडने १५ चेंडू आणि ५ गडी शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या-
गंभीर दुखापतीमुळे शुबमन इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, ‘या’ क्रिकेटरला मिळणार तिकीट!
दोन दशकांपूर्वी रॉबिन सिंगने केलेला ‘हा’ विक्रम अजूनही अबाधित, आता भुवीकडे पराक्रम करण्याची संधी






