---Advertisement---

बडा याराना लगता है! विश्वचषकापूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी देशांच्या कर्णधारांमध्ये दिसला भलताच ब्रोमान्स

Rohit-Sharma-And-Babar-Azam
---Advertisement---

आयसीसी टी20 विश्वचषक 2022 चा महाकुंभमेळा सुरू होण्यासाठी आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. या स्पर्धेत बलाढ्य संघांना एकमेकांविरुद्ध भिडताना पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेत भाग घेणारे सर्व 16 संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पोहोचले आहेत. तसेच, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सराव करत आहेत.

इतकेच नाही, तर शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियामध्ये सर्व संघांच्या कर्णधारांनी एकमेकांची टी20 विश्वचषकापूर्वी भेट घेतली. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांचाही समावेश होता. दोघांमध्ये या स्पर्धेपूर्वी भलताच ब्रोमान्स पाहायला मिळाला.

रोहित आणि बाबरमध्ये पाहायला मिळाली मैत्रीची झलक
आयसीसी टी20 विश्वचषक 2022मध्ये पुढील रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात सामना खेळला जाणार आहे. यासाठीही नेहमीप्रमाणेच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मात्र, या मोठ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार रोहित शर्मा आणि बाबर आझम (Rohit Sharma And Babar Azam Bromance) यांच्यामध्ये मैत्रीची झलकही पाहायला मिळाली. दोन्ही संघांचे कर्णधार मजा-मस्ती करताना दिसले. यावेळी त्यांनी फोटोशूटवेळीही मजा केली. अशात आता या दोघांमधील हे खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

‘आम्हाला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे महत्त्व माहिती आहे’
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने भारत- पाकिस्तानमधील सामन्याबाबत मोठे वक्तव्यही केले. तो म्हणाला की, “आम्हाला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे महत्त्व माहिती आहे. मात्र, नेहमी चर्चा करण्याला अर्थ नाही. विशेष म्हणजे, जेव्हा आम्ही आशिया चषकादरम्यान भेटलो होतो, तेव्हाही आम्ही कुटुंबाबद्दल चर्चा करत होतो. तुझ्याकडे कोणत्या गाड्या आहेत, याबद्दलही चर्चा झाली होती.”

विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान संघ आशियाचषकादरम्यान आमने-सामने आले होते. यावेळी दोन्ही सघांमध्ये या स्पर्धेत 2 सामने खेळले गेले होते. यामधील एक सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशने टी20 विश्वचषकाच्या संघात केला बदल, मुख्य संघातील ‘या’ दोन खेळाडूंची थेट घरी पाठवणी!
हे भयंकर घडले! विराटच्या चाहत्याने केली रोहितच्या चाहत्याची निर्घृण हत्या; वाचा संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---