भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 1 मार्च) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. इंदोर येथील मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी आपली पुढील रणनीती देखील जाहीर केली.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाने दणदणीत विजय साजरे केले. नागपूर व दिल्ली येथे झालेले हे सामने भारतीय संघाने तीन दिवसात जिंकले. त्यामुळे इंदोर सामना भारतीय संघ जिंकण्याची शक्यता अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना रोहित शर्मा याने इंदोर कसोटी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच हा सामना जिंकल्यानंतर आपण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तयारीची सुरुवात करू असे देखील त्याने म्हटले. तो म्हणाला,
“इंदोर कसोटीचा निकाल आमच्या मनासारखा राहिल्यास अहमदाबाद कसोटीत आम्ही वेगळा विचार करू. त्या कसोटीचा उपयोग जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी म्हणून केला जाईल. शार्दुल ठाकूरही त्या योजनेचा भाग आहे. मात्र नुकतेच त्याचे लग्न झालेय. परंतु, अहमदाबाद कसोटीत आम्ही नक्कीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करू.”
इंदोर कसोटी जिंकल्यास भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी थेट पात्र ठरेल. स्पर्धेचा अंतिम सामना 6 जूनपासून ओव्हल येथे खेळला जाईल. भारतीय संघाला या स्पर्धेच्या पहिल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पराभूत करत विजेतेपद जिंकले होते.
(Indian Captain Rohit Sharma Eyeing WTC Final Ahead Border-Gavaskar Trophy Third Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख
राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्याचा अर्थ काय? मौन सोडत रोहित स्पष्टच बोलला, ‘त्याला महत्त्वच देऊ नका’