सध्या भारत आणि बांगलादेश संघात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला दुखापत झाली आहेे. त्याच्या या दुखापतीनंतर त्याला मैदान सोडावे लागलेे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेेशने फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी कर्णधार लिटन दास आणि अनामुल हक खेळपट्टीवर आले होते. भारतासाठी मोहम्मद सिराज दुसरे षटक टाकण्यासाठी आलेला. सिराजच्या षटकाचा चौथा चेंडू अनामुल हक याच्या बॅटला लागून स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या रोहित शर्माच्या हातात गेला आणि रोहितच्या हातून हा झेल सुटला. मात्र, नंतर लक्षात आले की रोहितच्या हाताला यामुुळे गंभीर इजा होऊन त्याचा हातही रक्तबंबाळ झाला.
रोहितच्या हातून झेल सुटल्यानंतर फलंदाजाचा आनंद फार काळ टीकू शकला नाही. सिराजच्या त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर अनामुल हक पायचित झाला. रोहित दुखापतग्रस्त झाल्यानेे संघाचे नेतृत्व केएल राहुल याच्यावर सोपवण्यात आले. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. संघात उमरान मलिक आणि अक्सर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताला हा दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे गरजेेचे आहे. जर या सामन्यात भारताचा पराभव झाला तर बांगलादेशला 2015चा इतिहासाच्या पुनरावृत्ती करण्याची संधी असेल. 2015मध्ये भारताला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा इतिहास घडवला होता.(Indian Captain Rohit Sharma got seriously injured while taking catch due to which bleeding took paave in his hand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल यजमानांच्या पारड्यात! रोहितसेना दोन बदलांसह उतरणार मैदानात
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच पडला दुसऱ्या कसोटीतून बाहेर, आता नेतृत्व कोण करणार?