सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय़ मालिका खेळण्यात व्यस्त आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन एकदिवसीय सामने खेळले गेले. त्यामध्ये पहिला सामना बरोबरीत सुटला, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताला 32 धावांनी पराभूत केलं. आज (7 ऑगस्ट) रोजी कोलंबो मैदानावर तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत झेप घेतली आहे.
भारत आणि श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) शानदार अर्धशतकी खेळी खेळली. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार 64 धावांची खेळी खेळली. परंतू तरीही भारतानं दोन्ही सामने गमावले. कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे भारतीय संघाला कोणीही सावरलं नाही. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अजून त्याच्या लयमध्ये दिसून आला नाही. दोन्ही सामन्यात तो फिरकीपटूंविरुद्ध एलबीडब्यू बाद झाला.
भारतीय कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) दोन्ही सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यामुळे त्याला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. तो फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर पाकिस्तान कर्णधार बाबर आझम आहे. यादरम्यान दिग्गज खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत एका स्थानानं घसरण झाली आहे. त्याच्या जागी भारतीय कर्णधार रोहित शर्मा पोहोचला आहे.
Rohit Sharma moves to Number 3 in ICC ODI Batters ranking. 🔥
– Captain leading by example, Hitman. pic.twitter.com/Nysn1hcqIS
— Johns. (@CricCrazyJohns) August 7, 2024
श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं (Virat Kohli) एकही अर्धशतक झळकावलं नाही. कोहली 30 धावांचा टप्पादेखील पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे त्याची आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत एका स्थानानं घसरण झाली. कोहली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत आता चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल गाजवलेल्या खेळाडूचं वनडे पदार्पण, केएल राहुलचा पत्ता कट
IND vs SL: निर्णायक सामन्यासाठी भारतानं दोन मोठ्या खेळाडूंना दिला डच्चू! संघात मोठे उलटफेर
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच