---Advertisement---

आयपीएल गाजवलेल्या खेळाडूचं वनडे पदार्पण, केएल राहुलचा पत्ता कट

On: बुधवार, ऑगस्ट 7, 2024 3:38 PM
---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. निर्णायक सामन्यात संघातून केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संघातून वगळण्यात आले आहे. तीन सामन्याच्या मालिकेत यजमान संघ 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना टाय झाला होता. आश्या परिस्थितीत भारतीय संघाला मालिका बरोबरीत मिटवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. संघ व्यस्थापनाने या सामन्यात रियान परागला वनडे पदार्पणाची संधी दिली आहे.

आज (07 ऑगस्ट) खेळवाल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात राजस्थान राॅयल्सचा स्टार फलंदाज रियान परागने वनडे करिअरमध्ये पदार्पण केले आहे. सामन्याआधी त्याला विराट कोहलीकडून कॅप देण्यात आले. तसेच टी20 विश्वचषकानंतर रियान परागची झिम्बाब्वे विरुद्ध टी20 मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. या मालिकेत त्याने भारतीय संघासाठी टी20 मध्ये डेब्यू  केले होते.

श्रीलंका दाैऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाने 3-0 ने मालिका आपल्या नावे केली. तर दुसरीकडे एकदिवसीय मालिका मात्र भारतासाठी निराशाजनक राहिली आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात भारत मजबूत परिस्थितीत असताना देखील सामना जिंकू शकला नाही. यजमान संघ शानदार फिरकी गोलंदाजी करत सामना टाय केला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात कमबॅक करत श्रीलंकन संघ टीम इंडियाचा पराभव केला. ज्यामुळे यजमान संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघासमोर मात्र सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे.

हेही वाचा-

IND vs SL: निर्णायक सामन्यासाठी भारतानं दोन मोठ्या खेळाडूंना दिला डच्चू! संघात मोठे उलटफेर
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच
अपात्रतेची बातमी ऐकून विनेश फोगटची तब्बेत बिघडली, पॅरिसमधील रुग्णालयात दाखल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---