गयाना। मंगळवारी(6 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना प्रोविडन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकली आणि वेस्ट इंडीजला व्हाईटवॉश देण्याचा पराक्रम केला. या विजयामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाववर खास विक्रम झाला आहे.
3 सामन्यांच्या टी20 मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईटवॉश देणारा विराट तिसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी असा पराक्रम एमएस धोनी आणि रोहित शर्माने केला आहे.
विशेष म्हणजे रोहितने असा पराक्रम दोन वेळा केला आहे. तर धोनी आणि विराटने प्रत्येकी एकदा असा कारनामा केला आहे.
धोनीने 2016 ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला होता.
त्यानंतर 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध भारतात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 3-0 असा टी20 मालिकेत विजय मिळवला होता. तसेच 2018 ला भारतात वेस्ट इंडीज विरुद्धही रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 3-0 ने टी20 मालिका जिंकली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–दोन दिवसापूर्वीच रोहित शर्माने केलेल्या विश्वविक्रमाची किंग कोहलीने केली बरोबरी
–स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीत घेतली मोठी झेप; विराटचे अव्वल स्थान धोक्यात
–मैदानात पाऊल टाकताच राहुल चाहरचा झाला या खास यादीत समावेश