---Advertisement---

ब्रेकिंग! भारतीय प्रशिक्षक द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, आशिया चषकातील उपस्थितीबद्दल बीसीसीआयकडून अपडेट

rohit-sharma-rahul-dravid
---Advertisement---

आशिया चषक २०२२ही स्पर्धा अगदी तोंडावर आहे. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता या स्पर्धेचे महत्व अधिक वाढले आहे. अशातच आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या अगदी आठवडाभर आधीच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिया चषकासाठी जात असताना झालेल्या नियमित चाचणीमध्ये द्रविड यांना कोरोनाचे काही लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली आहे.

आशिया चषक २०२२साठी संपूर्ण टीम इंडिया २३ ऑगस्ट रोजी युएई येथे जमणार आहे. द्रविड सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याने ते उशीरा संघासोबत जोडले जातील. त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाईल आणि ती चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर द्रविड संघासोबत जोडले जाणार असल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –

‘दिलसे बुरा लगता है भाई!’ युझवेंद्र चहलने सर्वांसमोर व्यक्त केलं दु:ख
शानदार सिक्स ठोकला, पण नंतर झिम्बाब्वेच्या फलंदाजाची झाली दुर्दशा; मैदानातच लागला लोळू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---